
ढाणकी प्रतिनिधी : प्रवीण जोशी
सहा महिन्या पूर्वी झालेला रस्ता हा अतिशय खड्डेमय झाला असून नागरिकांना , शालेय विद्यार्थी व शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. झालेल्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून अवघ्या सहा ,सात महिन्यातच या रस्त्याची गुणवत्ता दिसून येत आहे. नगर प्रशासन सक्तीने कर वसूल करत आहे मात्र शहरात मूलभूत गरजा पुरविण्यास नगर प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेना उ.बा.ठाकरे पक्षाच्या वतीने २३/१/२०२५ रोजी निवेदन सुद्धा दिले होते. परंतु निवेदन देऊन सुद्धा नगर प्रशासनाने डोळेझाकपणा केला. या रस्त्याने जात असताना जीव टांगणीला लावून प्रवास करावा लागत आहे. सर्व गीट्ट ही उघडी पडली आहे. उघडी पडलेली गिट्ट मुळे पायी प्रवास करते वेळी गिट्टी शालेय विद्यार्थी किंवा कोणत्या नागरिकांच्या पायात खूपसल्यास दुखापत होण्याची दाट शक्यता आहे. तसेच टू व्हीलर ने प्रवास करतेवेळी टू व्हीलर सुद्धा स्लीप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टू व्हीलर स्लिप झाल्यास एखादी गिट्टी डोक्यात खूपसल्यास डोक्याला इजा होऊन जीवित हानी होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही.तसेच या रस्त्याला हॉस्पिटल, शाळा , नगरपंचायत कार्यालय सुद्धा आहे. रस्ता पूर्णपणे चाळणी झाल्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे श्वसनाचे, व फुफुसाचे रोग सुद्धा भविष्यात उद्भवण्याची शक्यता नाकारता येणार नाही.परंतु संबंधित ठेकेदार व नगर प्रशासन मात्र निद्रा अवस्थेत आहे. लवकरच नगर प्रशासनाची निद्रा शहरातील नागरिक उडवल्याशिवाय राहणार नाहीत असे दिसून येत आहे. लवकरच या रस्त्यासाठी जन आंदोलन उभे राहील असे दिसून येत आहे. बऱ्याच वेळेस या रस्त्याविषयी आंदोलन उभे करण्याचे जनतेतून बोलले जात आहे.तर काही पक्षाच्या वतीने सुद्धा बोलल्या जात आहे परंतु या रसत्यासाठी कोणता पक्ष सुरुवातीस पुढे जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्यावेळी आंदोलन उभे राहील तेव्हाच नगर प्रशासनाची निद्रा उडेल असे चित्र सध्या तरी दिसत आहे. चौकट . २३/१/२०२५ रोजी उ.बा. ठाकरे शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते.त्यात नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी प्रभाग क्रमांक 17 सुभाष वाईनबार ते,गजानन जिल्हावार यांचे घर इथ पर्यंत जो रस्ता झालेला आहे. त्या रस्त्याबाबत चर्चा करून काम करून देऊ असे लेखी आश्वासन दिले होते परंतु अद्याप काम पूर्ण झालेले नाही. म्हणून पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने आंदोलन करण्याचे ठरले आहे. उ.बा. ठाकरे शिवसेना युवा सेना तालुका प्रमुख संभाजी गोरटकर
