

उमरखेड तालुका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
निंगनूर येतील शेतकरी ढाणकी स्टेट बँकेत सुरळीत व्यवहार सुरु असताना 35 किलोमीटर अंतरावरील सेंट्रल बँक उमरखेड शाखेला जोडल्या गेल्याने या बँकेचे व्यवहार करण्यासाठी शेतकऱ्यांची नाहक आर्थिक मानसिक व शारीरिक दगदग सहन करावी लागत असल्याने उमरखेड सेंट्रल बँक ऐवजी शेतकऱ्यांना ढाणकी स्टेट बँकेशी जोडण्यात यावे अशा आशयचे निवेदन निंगनूर येतील शेतकऱ्यानी जिल्ह्याचे पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांना निवेदन दिले आहे .निंगनूर येथील शेतकऱ्यांचे सर्व व्यवहार मागील 30ते 40 वर्षापासून गावा जवळील ढाणकी शाखेत सुरळीत चालू असताना बँक प्रशासनाने सुमारे 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरखेड सेंट्रल बँक शाखेला निंगनूर गाव जोडले आहे त्यामुळे वाहनाची वाणवा असलेल्या या भागातून उमरखेड बँकेशी व्यव हार करताना शेतकऱ्यांना मानसिक शारीरिक व आर्थिक फटका वेळ पैशा व श्रम व्यर्थ वाया घालवावा लागत असल्याने याबाबत ज़िल्याचे पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांनी शेतकऱ्यांची होणारी ससेहोलपत दूर करण्यासाठी ढाणकी स्टेट बँकेचे व्यवहार पूर्ववत करावे अशा आशायचे निवेदन शेतकरी चिंतागराव कदम शिवसेना सहसपंर्क प्रमुख तथा माजी जि. प. सदस्य यवतमाळ प्रवीण पाटील मीराशे शिवसेना तालूका प्रमुख तथा माजी सभापती पंचायत समिती उमरखेड बालाजी महाले माजी सरपंच निंगनूर अंकुश राठोड माजी उपसरपंच प्रमोद जयसवाल दीपक खंदारे शरद पंडागळे. विलास तुळशीराम राठोड प्रेस रिपोटर प्रल्हाद केशव जाधव नाईक व कैलास राठोड चिंतागराव कदम प्रविण पाटील मिरसे यांच्या हस्ते निवेदन पत्र देण्यात आले.
