ढाणकी शहरातील हनुमान मंदिरामध्ये चिमुकल्यांनी सादर केली श्रीराम यांच्या जीवनपटावर लघुनाटिका


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी


संपूर्ण देशात अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी राम जन्म उत्सवात अगदी तन-मन-धनाने रममान झाले असताना यात बालगोपाल सुद्धा कुठेही कमी नव्हते. ढाणकी शहरातील हनुमान मंदिरात प्रभू रामचंद्राच्या जीवनातील व रामायण ग्रंथातील भूमिकेला अनुसरून एक लघु नाटीकेचे स्वाध्याय परिवारातील महिला मंडळांनी या लघु नाटिकेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते
यावेळी श्रीराम, बिबीशन, हनुमंतराय, अंगद, सुग्रीव, अशा विविध भूमिका चिमुकल्यांनी सादर केल्या विशेष म्हणजे ही हरहुन्नरी बालगोपालांची लघु नाटिका बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात हनुमान मंदिरातील सभागृहामध्ये भाविक भक्त जमले होते यामुळे चिमुकल्यांचा आनंद व हर्षउल्हास गगनात मावत नव्हता.अतिशय सुंदर अशी वेशभूषा साकारली होती व योग्य अशा भूमिका चिमुकल्याने बजावली अत्यंत अचूक असे सुसंवाद योग्य अशा ठिकाणी चिमुकली साधत होती. त्यामुळे आश्चर्य सगळ्यांनाच वाटत होते यावेळी सामूहिक रामरक्षा सुद्धा पठण करण्यात आली. स्वाध्याय परिवारातील मंडळीची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. तसेच ज्या बालकांनी जी भूमिका वटवली ती भूमिका वटवितांना अचूक संवाद होत होते हे विशेष अनेक भूमिका साकारत असताना धनुष्यबाण गदा अशा सर्व बाबींची उपलब्धता होती त्यामुळे कार्यक्रम सुंदर झाला व येणाऱ्या काळात लहान चिमुकल्यावर योग्य संस्कार होऊन देशाचे नेतृत्व व कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना अशा संस्काराची मदत होईल एवढे मात्र नक्की यावेळी स्वाध्याय परिवारातील महिला मंडळांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले व येणाऱ्या काळामध्ये विविध अशा मुलांवर संस्कार होणारे कार्यक्रम आयोजित करून योग्य संस्कार करण्याचा प्रयत्न करु असे ही यावेळी सांगितले.