महातोली येथे श्री भुराजी महाराज यांचे 41व्या पुण्यतिथी निमित्ताने धार्मिक उत्सवाचे आयोजन


उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )


परमहंस श्री भुराजी महाराज यांच्या 41व्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्ताने आज महातोली ता. दारव्हा जि. यवतमाळ येथे धार्मीक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.संजय भाऊ राठोड हे उपस्थित राहून परमहंस श्री भुराजी महाराज यांच्या दर्शन मा. संजय भाऊ राठोड यांनी घेतले.श्री क्षेत्र महातोली या पवित्र ठिकाणी आयोजित भक्तिमय सोहळ्यास परमहंस श्री भुराजी महाराज यांचे राज्यभरातील अनुयायी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भाविकांशी मनोभावे संवाद मा. संजय भाऊ राठोड यांनी साधला.