चिखली येथे संगीतमय श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह

सहसंपादक: रामभाऊ भोयर

श्री गुरुदेव सेवा मंडळ श्रीमद् भागवत सप्ताह आयोजक समिती व समस्त चिखली व (वनोजा) ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यस्मरण सोहळा व वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांच्या पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त चिखली येथे दिनांक १८ डिसेंबर २०२३ सोमवार ते २५ डिसेंबर २०२३ सोमवार या दरम्यान प्रार्थना मंदिर आठवडी बाजार चौक चिखली येथे संगीतमय श्रीमद् भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी संगीतमय श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहला भागवत प्रवक्ते म्हणून .ह. भ. प. भागवताचार्य श्रद्धेय प्रितमजी महाराज भोयर खांबाडा हे असून साथ संगत गायक- हर्षल महाराज राऊत माऊली महाराज राऊत आर्गनवादक- सोनू महाराज गवई, तबलावादक -मयूर उमाळे,पॅडवादक- वैभव गिरी,झॉकी- मंगेश पाल, अभय ठाकरे, पवन पढाल, यांची साथ संगत लाभणार आहे. या भागवत सप्ताहाचा दैनंदिन कार्यक्रम दिनांक सोमवार १८ डिसेंबर २०२३ सकाळी पाच वाजता ग्राम सफाई साडेपाच वाजता ध्यान पाठ सकाळी नऊ ते अकरा कलश स्थापना पूर्वतयारी दुपारी बारा वाजता श्री हभप प्रीतम जी महाराज भोयर यांचे शुभहस्ते घटस्थापना दुपारी तीन ते सहा भागवत पर्व सायंकाळी सहा ते सात सामुदायिक प्रार्थना साडेसात ते साडेआठ हरिपाठ रात्री नऊ वाजता श्री गुरुदेव सेवा मंडळ चिखली यांचे भजन १९ डिसेंबर २०२३ मंगळवारला सकाळी पाच वाजता ग्रामसफाई साडेपाच वाजता ध्यान पाठ व काकड आरती नऊ ते बारा भागवत पर्व दुपारी तीन ते सहा भागवत पर्व सायंकाळी सहा ते सात सामुदायिक प्रार्थना सकाळी साडेसात ते साडेआठ हरिपाठ रात्री नऊ वाजता गायत्री महिला भजन मंडळ चिखली यांचे भजन २० डिसेंबर २०२३ बुधवार ला सकाळी पाच वाजता ग्रामसफाई साडेपाच वाजता ध्यान पाठवा काकड आरती नऊ ते अकरा भागवत पर्व दुपारी तीन ते सहा भागवत पर्व सायंकाळी सहा ते सात सामुदायिक प्रार्थना साडेसात ते साडेआठ हरिपाठ रात्री नऊ वाजता दुर्गा उत्सव महिला भजन मंडळ चिखली यांचे भजन २१ डिसेंबर २०२३ गुरुवार ला सकाळी पाच वाजता ग्रामसफाई साडेपाचला ध्यान पाठव काकड आरती नऊ ते अकरा भागवत पर्व दुपारी तीन ते सहा भागवत पर्व सायंकाळी सहा ते सात सामुदायिक प्रार्थना साडेसात ते साडेआठ हरिपाठ रात्री नऊ वाजता सुप्रसिद्ध भारूडकार ह भ प गणेश महाराज शिंदे( नेरी वर्धा )यांचे भारुड कार्यक्रम २२ डिसेंबर २०२३ रोज शुक्रवारला सकाळी पाच वाजता ग्रामसफाई साडेपाच वाजता ध्यान पाठ-व काकड आरती नऊ ते अकरा भागवत पर्व दुपारी तीन ते सहा भागवत पर्व सायंकाळी सहा ते सात सामुदायिक प्रार्थना साडेसात ते साडेआठ हरिपाठ रात्री नऊ वाजता शारदा महिला भजन मंडळ चिखली यांचे भजन २३ डिसेंबर २०२३ शनिवारला सकाळी पाच वाजता ग्रामसफाई साडेपाचला ध्यान पाठव काकड आरती नऊ अकरा वाजता भागवत पर्व दुपारी तीन ते सहा भागवत पर्व सायंकाळी सहा ते सात सामुदायिक प्रार्थना साडेसात ते साडेआठ हरिपाठ रात्री नऊ वाजता गुरुदेव सेवा मंडळ राळेगाव यांचा “एक शनिवार एक गाव उपक्रमात रुपेश रेंगे ग्रामगीताचार्य माजी तालुका सेवा अधिकारी राळेगाव यांचे मार्गदर्शन” २४ डिसेंबर २०२३ रविवारला सकाळी पाच वाजता ग्रामसफाई साडेपाच वाजता ध्यान पाठ व काकड आरती नव्हते अकरा भागवत पर्व दुपारी तीन ते सहा भागवत पर्व सायंकाळी सहा ते सात सामुदायिक प्रार्थना साडेसात ते साडेआठ हरिपाठ रात्री नऊ वाजता थोर संत पुरुष यांचे जीवनावर भाषण नृत्य गीत गायन भजन वेशभूषा बाल कलाकाराकडून सादरीकरण तर २५ डिसेंबर २०२३ रोज सोमवारला सकाळी पाच वाजता ग्रामसफाई साडेपाच वाजता ध्यान पाठव काकड आरती नऊ ते अकरा काल्याचे किर्तन ह भ प श्री प्रीतम जी महाराज भोयर यांचे दुपारी बारा ते दोन पालखी मिरवणूक व दिंडी सोहळा दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी इयत्ता दहावी व बारावी मध्ये गावातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण समारंभ तसेच सर्व दिंड्यांचा मानधन वितरण समारंभ दुपारी चार वाजून अठ्ठावन मिनिटांनी मौन श्रद्धांजली डॉ मुडे दादा आजीवन प्रचारक गुरुकुंज यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.तरी या भागवत सप्ताहाल गावातील तसेच बाहेर गावातील नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन श्री गुरुदेव सेवा मंडळ , श्रीमद् भागवत सप्ताह आयोजक समिती व समस्त चिखली (वनोजा) ग्रामवासी यांनी केले आहे.