राळेगाव तालुका सरपंच संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारला धरणे आंदोलन

रामभाऊ भोयर :रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील तालुका सरपंच संघटनेच्या वतीने दिनांक ९ जानेवारी २०२४ रोज मंगळवार ला विविध मागण्या संदर्भात तहसील कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या धरणे आंदोलनात विविधी मागण्या असून (१) घरकुल, विहीर, गोठा व ग्रामपंचायत च्या शासकीय कामाकरिता बाळू उपलब्ध करून देणे,(२) ग्रामीण भागातील घरकुल रकमेत वाढ करून शहरी लाभार्थ्याप्रमाणे ग्रामीण लाभार्थ्यांना अडीच लाख रुपये एवढे अनुदान रक्कम देण्यात यावे,(३)तसेच ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांचे मानधन वेळोवेळी देण्यात यावे या मागणीसाठी राळेगाव तालुक्यातील सर्व सरपंच सदस्य व घरकुल लाभार्थी तसेच विहीर, गोठा,यांचे सर्व लाभार्थ्यांनी मंगळवारला दुपारी ठीक १२ वाजता या धरणे आंदोलनात आपल्या हक्कासाठी एकत्र यावे असे आवाहन राळेगाव तालुका सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आले त्यावेळी सुधीर जवादे पाटील, अंकुश मुनेश्वर, किशोर धामंदे, विशाल येनोरकर,सी.ऐस.मेश्राम, लताताई घोटेकर,कीरणताई महाजन, शालिनीताई तोडासे,व राळेगाव तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.