न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथे सखी सावित्री समितीची स्थापना

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथे आज दिनांक 26/8/2024 रोज सोमवारला सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली ‌या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सौ.अर्चनाताई धर्मे उपस्थित होत्या.या समितीच्या सभेला शिक्षक प्रतिनिधी म्हणून सौ.मनिषा ईखे मॅडम तर समोपदेशक म्हणून अँडव्होकेट रोशनी वानोडे मॅडम, पोलिस विभागाच्या श्रीमती माधुरीताई मेश्राम, वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी म्हणून कु.निलमा गोंडे मॅडम,तर प्रमुख पाहुणे म्हणून भावनाताई खणगन मॅडम,तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.मोहिनी प्रतिक बोबडे उपस्थित होत्या.या कार्यक्रमात तर स्त्रीयावरील होणाऱ्या अत्याचारांच्या बाबतीत चर्चा करण्यात आली.यावर मुली, स्त्रियांनी स्वताच सकारात्मक होण्याची गरज आहे असा आग्रह मान्यवरांनी केला.वैद्यकिय क्षेत्रात तसेच कायदे विषयक अधिकाराबद्धल तसेच समाजातील ईतर घटकांवर देखील प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली चौधरी मॅडम यांनी केले तर आभार सौ.मनिषा ईखे मॅडम यांनी मानले.या कार्यक्रमाला सर्व जेष्ठ आणि श्रेष्ठ शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते ‌