

सहसंपादक : रामभाऊ भोयर
भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) कापसाची करीत असलेली खरेदी १४ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू करण्यात आली होती आता कापूस खरेदी करण्याची अंतिम तारीख २७ फेब्रुवारी २०२६ ही निश्चित करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी आता सी सी आय खरेदी केंद्रावर कापूस विक्री करिता केवळ दहा दिवस शिल्लक असून तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना आपला कापूस सी सी आय केंद्रावर विक्री करायचा आहे व ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कापसाची कपास किसान अँप वर नोंदणीकृत केलेली आहे अशा कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किमतीचा लाभ घेण्यासाठी २७ फेब्रुवारी २०२६ च्या अगोदर स्लॉट बुकिंग करून आपला कापूस सीसीआय केंद्रावर विक्रीकरिता आणावा अन्यथा आपला कापूस २७ फेब्रुवारीच्या नंतर घेतल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी असे आवाहन सीसीआय चे अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.
