वरोरा तालुक्यात विमानाने घिरट्या,नागरिक अचंबित

वरोरा व तालुका परिसरामध्ये चार ते पाच दिवसांपासून विमान जवळून घिरट्या घालत आहे. यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. रविवारी हे विमान वरोरा-माजरी परिसरामध्ये घिरट्या घालताना दिसले. नागरिकांनी याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
वरोडा व वणी भागांमध्ये जंगल आणि कोळशाच्या खाणीची विपुलता आहे. नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोन्याचेसाठे असल्याची माहिती पुढे आली होती.
अगदी कमी उंचीवरून विमानाने गिरट्या घातल्याने नक्कीच या भागात
खनिज संपत्ती असल्याचा अंदाज बांधला जात आहे. काही वर्षांपूर्वी या भागामध्ये ‘ऑइल अॅण्ड नॅचरल गॅस कार्पोरेशन’ने तालुक्यातील काही भागात पाहणी केली होती हे विशेष.
‘हे विमान वरोरा व वणी भागातील भूगर्भातील खनिज संपत्तीच्या साठ्यांबाबत सर्वेक्षण करीत आहे असा अंदाज आहे. या भागात वने आणि नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध आहे. यापुढे त्याचा शोध घेतला जाईल. यासाठी विमान घिरट्या घालत आह असा अंदाज आहे.