
सहसंपादक : रामभाऊ भोयर
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राळेगाव अर्तगत ” सन्मान कर्तुत्वाचा ” या कार्यक्रमाचे आयोजन ६ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सागर विठाळकर बालविकास अधिकारी राळेगाव होते, तसेच प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पर्यवेक्षिका श्रीमती संजिवनी ओंकार, मंजुश्री खसाळे, निशा पाटील, धरती कोराम, रश्मी विठाळकर, मोहन भोरे, मोहन मेघावत, शुभम ठाकरे, अक्षय रामगडे, नितेश ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व प्रथम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन दीपप्रज्वलन करण्यात आले.तसेच लता माटे यांनी सुंदर स्वागतगीत गायन केले. त्यानंतर पर्यवेक्षिका संजिवनी ओंकार ह्या नियतवयोमानामुळे सेवा निवृत्त झाल्या व मंजुश्री खसाळे तसेच निशा पाटील पर्यवेक्षिका यांची बदली झाल्याने त्यांना निरोप समारंभ व प्रकल्पाच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच पोषण अभियान व प्रकल्पात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा शाल व प्रमाणपत्र देऊन सत्कार व गौरव करण्यात आला यामध्ये भिमसेनपुर येथील सेविका आम्रपाली खोब्रागडे भिमसेनपुर , योगिता कुडे एकुरली , शांता कन्नाके वडकी, दिपाली भगत आष्टा, राखी थुल मेंगापुर ,वर्षा नरड शेळी, शिवानी मडावी जळका यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कल्पना महाकुलकर सेविका पिंपळगाव यांनी केले,सर्व मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले, एकंदरीत कामकाजात राळेगाव प्रकल्पाचे नाव चांगल्या उंचीवर नेण्यामध्ये सतत सहकार्य करणार्या तिनही पर्यवेक्षिकांना प्रकल्प सदैव आठवणीत ठेवेल असे प्रतिपादन सागर विठाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन केले.
त्याचप्रमाणे सर्व पर्यवेक्षिका यांनी आपापले मनोगत व्यक्त केले तसेच अंगणवाडी सेविका शांता कन्नाके, राखी कुळसंगे,संध्या मैसकर, वेणूताई पेंदोर,कल्पना बागेश्वर, मंदा आमटे, यांनीसुद्धा मनोगत व्यक्त केले.यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम व गित गायन कार्यक्रम सुध्दा घेण्यात आले यामध्ये लता माटे यांना गित गायन केले तसेच पर्यवेक्षिका निशा पाटील यांनी गित गायन केले,वरध बिटच्या नव्यानेच लागलेल्या मदतनीस किरण आंजिकर, प्रणाली बोंदाडे, पोर्णिमा बोंदाडे, प्रणाली मेश्राम,धनश्री तोडसाम, कोमल किन्नाके यांनी सुंदर नृत्य सादर केले सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला, धरती कोराम पर्यवेक्षिका यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सेविका मदतनीस यांनी सहकार्य केले.
