गजापुर (शहागड) येथील मज्जित व दर्गा या धार्मिक स्थळावर दगडफेक करणाऱ्यावर कार्यवाई करा: तहसीलदार राळेगाव यांच्या मार्फत महाराष्ट्रचे मा.मुख्यमंत्री यांना निवेदन सादर



सहसंपादक : रामभाऊ भोयर

महाराष्ट्रामध्ये फुले शाहू, आंबेडकर विचार सरनीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.सगळे सुरळीत चालू असताना महाराष्ट्रातील सर्व धर्मीयांच्या भावना दुखावण्याच्या हेतुने महाराष्ट्राला गालबोट, बदनाम करण्याचे काम सद्या चालू आहे.
विशाल गडापासून 3 ते 4 कि.मी.अंतरावर असलेल्या गजापुर (शहागड) जि.कोल्हापूर येथील मुस्लिम वस्तीवर जाणीवपूर्वक हल्ला करून तेथील मस्जिद,दरगाह या धार्मिक स्थळांची तोडफोड करुन व 30 ते 40 घरांची नासधुस लुटपाट करुन,त्यांची दुचाकी, चारचाकी,वाहनांची तोडफोड करुन,लहान मुले,गोरगरीब महिला यांना मारहाण करुन जखमी केले.त्यामुळे महाराष्ट्रातील धार्मिक वातावरण बिघडवण्याच्या दृष्टीने ही दंगल घडविण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे.
तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेबांना विनंती आहे की आपण महाराष्ट्रातील धार्मिक, जातीय वातावरण चांगले राहावे म्हणून गजापुर (शहागड) जि. कोल्हापूर येथील झालेल्या दंगली मधील सामील दंगलखोरांवर कडक कार्यवाही करून निष्पक्ष चौकशीचे आदेश द्यावेत हि तमाम मुस्लिम बांधवांच्या वतीने आदरपूर्वक विनंती. निवेदन देतांना उपस्थितांमध्ये.सुन्नी जामा मस्जिद, कबरस्थान कमेटी, ईदगाह कमेटी चे अध्यक्ष इमरान हाजी हैदर खान पठाण, सचिव, माझी नगरसेवक सय्यद अफसर अली,
सय्यद सलीम भाई, सना उल्लाह खा पठाण, सय्यद रियाज अली, सय्यद लियाकत अली, रज्जाक भाई भिमानी, ज्यूसफ भिमानी, अक्रम खा, गफ्फार भाई, शेख पैकू कूरेशी, रफिक भाई,
सलमान भिमानी, असीम भिमानी, अशपाक भिमानी तौसिफ़ भिमानी, तोहीद भिमानी अक्रम पठाण, बादशाह भाई काझी,शेख मुस्ताक भाई, शेख राजू भाई, शैझान कूरेशी, शोहेब पठाण,अवेज कूरेशी,शेख सलमान सह असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.