होमिओपॅथिक फिजीशियन असोसिएशन गोंडपिपरी ,कोठारी, पोंभूर्णा तफेॅ इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड प्राप्त डॉ. कीरमे यांचा सत्कार

पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम

दिनांक १४ जान. २०२४ ला विश्रामगृह पोंभूर्णा येथे आयोजित सत्कार समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूर येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ तूंबडे,चंद्रपूर येथील यूराॅलाॅजिसट डाॅ. बोरीकर , डॉ. संगत, आरथेपेडिक तज्ञ ,आणि होमिओपॅथिक फिजीशियन असोसिएशन चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या स्वयं संशोधित उपचार पद्धतीने डोक्यावरील केस गेलेल्या रुग्णाचे केस पूर्वरत उगवणे,टक्कल पडलेली असल्यास केस उगवणे, या करीता त्यांच्या उपचार पद्धतीची इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड मधे नोंद करण्यात आली असून त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे सत्कार प्रसंगी, आपल्या संशोधनाविषयी बोलतांना आपल्या लोकांनी केलेल्या सत्काराने आपण भारावून गेलो आणि असे सत्कार नेहमीच प्रेरणा देत राहतील असे मत डॉ. किरमे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला उपस्थित संघटनेचे अध्यक्ष डॉ पावडे, डॉ नैताम,डॉ उराडे डॉ. चांदेकर डॉ वाढई डॉ, डॉ डवरे,डॉ. लोहे, डॉ गेडाम, डॉ वांढरे, डॉ भसारकर,डॉ सातपुते, डॉ जिवने ,डॉ गंगारेडीवार कार्यक्रमाचे संचालन डॉ पावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ नैताम यांनी केले.