२९ जानेवारीला भीम बुद्ध गीतांचा स्वरांजली पर कार्यक्रम

सहसंपादक : रामभाऊ भोयर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच राळेगाव यांच्या वतीने २६ जानेवारी भारतीय संविधान अंमलबजावणी दिनानिमित्त राळेगाव येथे २९ जानेवारी २०२५ रोज बुधवार ला सायंकाळी पाच ते दहा या वेळेत आठवडी बाजार राळेगाव येथे टीव्ही सिंगर (अकोला ) गायिका सपना खरात यांच्या भीम बुद्ध गीतांचा स्वरांजली पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या भीम बुद्ध गीतांच्या स्वरांजली पर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ विठ्ठल लढे तर प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाचे उपाध्यक्ष प्रवीण धुपे, उपाध्यक्ष प्रमोद काळे हे राहणार आहे तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तारीखभाई लोखंडवाला सामाजिक कार्यकर्ता यवतमाळ, गोपीचंद कांबळे इतिहासकार यवतमाळ, अंकुश मुनेश्वर सरपंच संघटना अध्यक्ष राळेगाव, रवी शेराम नगराध्यक्ष नगरपंचायत राळेगाव, सुंदर दास कांबळे सामाजिक कार्यकर्ते करंजी रोड, योगेश कांबळे पत्रकार संरक्षण समिती सचिव ,शामकांत येनोरकर माजी उपसभापती पंचायत समिती राळेगाव, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. तसेच या कार्यक्रमात मरणोपरांत गायक व रत्न पुरस्कार स्मृतीशेष भीम बुद्ध गीत गायक विजय बाबू म्हैसकर यांना मरणोपंत गायक रत्न पुरस्कार त्यांच्या धम्मचारीनी यांना प्रदान करण्यात येणार आहे तरी या भीम बुद्ध गीतांच्या स्वरांजली पर कार्यक्रमाचा तालुक्यातील समस्त नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे आयोजक बाबाराव नगराळे, इंद्रजित लभाने यांच्या वतीने करण्यात आले आहे.