जि. प. शाळा नागेशवाडी येथे शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
मो.7875525877

आज दिनांक 06 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठीक 9.00 वाजता शाळा व्यवस्थापन समितीची बैठक जि.प. शाळा नागेशवाडी येथे आयोजित करण्यात आली.
बैठकीत शाळा व्यवस्थापन समितीचे RTE Act 2009 नुसार पुनर्गठन करण्यात आले.
उपस्थित सर्व सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व बैठकीचे अध्यक्ष स्थान श्री विलास नामदेव जाधव यांनी सर्वानुमते भूषविले. बैठकीत सविस्तर चर्चा होऊन शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. तत्पूर्वी श्री पी. एन. गोंड सरांनी समितीची रचना, कर्तव्य व जबाबदाऱ्या यांची माहिती दिली.
बैठकीत सविस्तर चर्चा होऊन सर्वानुमते श्री सुनील अर्जुन जाधव यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी अनिल लक्ष्मण चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच
रोहिदास सुभाष जाधव
पुनम पवन राठोड
छाया मांगीलाल जाधव
वंदना फुलसिंग जाधव
सीमा प्रवीण जाधव
यांची सदस्य पदी निवड करण्यात आली.
तसेच स्थानिक प्रतिनिधी म्हणून अंकुश विक्रम राठोड व
शिक्षण प्रेमी म्हणून
विलास तुळशीराम राठोड(पत्रकार )यांची निवड करण्यात आली. शेवटी निवड झालेल्या सर्व सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व त्यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.