
अखंड परिश्रम व बुद्धीचातुर्याने मिळवले यश…
सहसंपादक : रामभाऊ भोयर
असाध्य ते साध्य करिता सायास,कारण अभ्यास तुका म्हणे असे संत तुकोबाराय सांगून गेले आहेत एखादी गोष्ट आवडीची असली की माणुस तिचा ध्यास घेतो रात्रंदिवस तिचाच विचार करत राहतो पाठपुरावा करतो अन फलश्रुती होते…या प्रक्रियेसच अभ्यास म्हणून संबोधले जाते…मनुष्य चरितार्थ चालवण्यासाठी नोकरी ,उद्योग करतो..मात्र त्याची आवड- निवड वेगळी असू शकते सांगण्याचे कारण म्हणजे राळेगाव येथील कृषी विभागात मंडळ अधिकारी असलेले राजू ताकसान्डे हे असेच एक अवलिया राज्य्शास्त्र विषयात पदवीधर नोकरी कृषी खात्यात अन आवड मेकैनिकल विभागात लहानपणपासूनच खटपट करणारा स्वभाव..त्यामुळे काही ना काही खटपटी करण्याचा स्वभाव या स्वभावामुळेच त्यानी बैटरी चार्जिंग वर धावणारी चार चाकी गाडी तयार केली आहे आय.टी.आय, डिप्लोमा,डिग्री इंजीनियरिंग असे कोणतेही शिक्षण नसताना केवळ आवड म्हणून,सतत ध्यास घेवून त्यानी ही गाडी बनवली आहे यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे सदर वाहन तयार करण्या साठी त्याना दोन लाख दहा हजार रुपये इतका खर्च आलेला आहे या कामी त्यानी लागणारी बैटरी स्वतः घरी तयार केली असुन तिची मोटार क्षमता पंधरा वॅट आहे गाडीला रिक्षाचे टायर बसवले आहे सदर गाडी 800 kg.वजनाची वाहतूक करते असुन,ती चार्जिंग केल्या वर 110 किमी अंतर चालून जाते..पुर्ण गाडी चार्ज होण्यासाठी चार तास वेळ पुरेसा असुन त्यासाठी फक्त चार यूनिट विजेची गरज लागते अशी गाडी केवळ छंद म्हणून तयार केली आहे भविध्यात संधी मिळाल्यास असे काही तरी अजून मोठे करण्याची इच्छा असल्याचे ताकसान्डे यानी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना सांगितले
