
सहसंपादक: रामभाऊ भोयर
दिनांक 15 जानेवारी 2024 चहांद महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जन्मदिवसानिमित्त राज्य क्रीडा दिन मोठ्या उत्साहात सोनामाता हायस्कूल चहांद मध्ये साजरा करण्यात आला. ऑलिंपिक या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्यातून स्वतंत्र भारतासाठी कुस्ती या क्रीडा प्रकारामध्ये प्रथम सुवर्णपदक मिळवणारे महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची जयंती राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता. त्यालाच प्रतिसाद म्हणून सोनामाता हायस्कूल चहांद येथे राज्य क्रीडा दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना पटांगणावर एकत्र करण्यात आले. विद्यार्थ्यांना खाशाबा जाधव यांच्या जीवनावर व त्यांनी क्रीडा प्रकारामध्ये मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल माहिती देण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना ऑलिंपिक खेळाबद्दल तसेच ऑलिंपिक खेळात उत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडू बद्दल माहिती इंटरनेटच्या मदतीने मिळवण्यास सांगण्यात आले. खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांच्या मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये विशेष करून रिले दौड, कबड्डी, लांब उडी, उंच उडी, कुस्ती, यासारख्या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दल विशेष आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये शाळेचे मुख्याध्यापक माननीय धोबे सर, चिव्हाणे सर, शिवणकर सर, दांडेकर सर, गोवारदिपे मॅडम, कांबळे सर, सावंत सर, राऊत सर, सोनवणे सर, हे सर्व कर्मचारी हजर होते. या कार्यक्रमासाठी वर्ग पाच ते दहा च्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग अतिशय उत्स्फूर्त असा होता.
