क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वाचनालयात बालिका दिन साजरा

राजुरा: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड येथे बालिका दिन साजरा करण्यात आला. सकाळी 8 वाजता स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आली. यावेळी गावातील विद्यार्थ्यांच्या मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ठीक 6 वाजता भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीत गावातील महिलांचा व विद्यार्थ्यांचा उत्सपूर्त प्रतिसाद लाभला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वर जयघोषाचे नारे लावण्यात आले. रॅली पूर्ण झाल्यानंतर वाचनालयात येऊन स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे जेष्ठ महिलांच्या हस्ते पूजन करण्यात आले. नंतर गितगायन व वकृत्व स्पर्धेला सुरुवात झाली. या वकृत्व आणि गीतगायन स्पर्धेत 20 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. समीक्षा मोडक,श्रुती बोरकर, कल्याणी भोंगळे,पल्लवी कळे,आरोही कमलवार, अस्मिता आस्वले, स्नेहा वांढरे, आषणा उरकुडे,पूर्वी अवघान, पूर्वा मंगर,विद्या चांदेकर,अवंतिका खंडाळे,संजीवनी सिडाम, प्रवीण चौधरी, समीक्षा कुळमेथे,प्रियांका पाल,ऋषाली वैरागडे या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतले. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर तसेच त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक कार्याबद्दल युवा सामाजिक कार्यकर्ता विशाल शेंडे व वनिता लाटेलवार यांनी विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन विशाल शेंडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा जिवतोडे हिने केले तर आभार श्रुती बोरकर या विद्यार्थिनीने मानले.