
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वडकी येथे आज दि ८ नोव्हेम्बर रोजी गुजराती समाजाचे दैवत श्री संत जलाराम बाप्पा यांची २२५ वि जयंती गावातील भक्तीधाम मंदिरात उत्साहात साजरी करण्यात आली. ह्यावेळी मंदिरात सकाळी श्री जलाराम बाप्पाचे मूर्ती पुजन होवून बाप्पाची आरती करण्यात आली.तसेच गावातील श्री जलाराम ऊत्सव समितीच्या वतीने राळेगाव चौफुलीवर असलेल्या उड्डाणपुलाखाली जलाराम बाप्पा यांचे प्रतिमेला आकर्षक अश्या फुलांनी सजवून बाप्पाचे पूजन करण्यात आले.नंतर टाळ मृदुंगाच्या गजरात बाप्पाची आरती करण्यात आली. यावेळी जलाराम उत्सव समितीच्या वतीने भक्तांना बुंदी व खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला.यावेळी अनेकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. या जयंतीनिमित्त गावातील समस्त जलाराम बाप्पा भक्त व गुजराती समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
