झाडगाव ग्रामपंचायतमध्ये एकल महीला सीमाताई निखाडे यांचे हस्ते ध्वजारोहण

सहसंपादक : रामभाऊ भोयर

भारत वर्षातील 78 वा स्वातंत्र्य दिन 15ऑगस्ट हा कार्यक्रम आगळा वेगळा व सामजिक विचार करुन ग्रामपंचायत चे सरपंच बाबारावजी किन्नाके, उपसरपंच रोशन कोल्हे व कार्यकारिणी सदस्यांनी निर्णय घेवून गावातीलच एकल महीला सीमाताई निखाडे यांचे हस्ते ध्वजारोहण करुन स्वातंत्र्य दिनाचे वेगळेपण जपून सामान्य व्यक्तीचा सन्मान केला,
गावामध्ये एकल महीलांचे दोन गट सामाजिक कार्य करीत आहे,
एकल महीलानी सरपंच, उपसरपंच यांचेशी चर्चा करुन स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रमांत एकल महीलेला संधी मिळावी म्हणुन चर्चा केली, व तो निर्णय ग्रामपंचायत ने एक मताने मान्य करुन अमलात आणला त्याबद्दल एकल महीला संघटना व प्रेरणा ग्राम विकास संस्थेच्या वतीने निलिमा रेंघे व सोनू भगत यांचे हस्ते ग्रामपंचायतचे सरपंच बाबाराव कीन्नाके व उपसरपंच रोशन कोल्हे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,