ढाणकी: येथे महर्षी मार्कंडे जयंती उत्साहात साजरी


प्रतिनिधी, प्रवीण जोशी.
ढाणकी.


पद्ममशाली समाजाचे आराध्य दैवत
श्री महर्षी मार्कंडेय भगवान जन्मोत्सव निमित्त सर्व पद्ममशाली बांधवानी मोठ्या उत्साहाने, व आनंदाने महर्षी मार्कंडे जयंती साजरी करण्यात आली. ढाणकी नगरीतून भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती. गावातील सर्व पद्मशाली समाज बांधव ,प्रतिष्ठित नागरिक, युवा वर्ग ,लहान चिमुकले व महिलांचा मोठा सहभाग शोभायात्रेत दिसून आला. टाळ मृदंगाच्या गजराने ढाणकी नगरी दुमदुमून गेली होती. गावातील भजनी मंडळांनी या रॅलीमध्ये विशेष सहभाग घेऊन शोभा यात्रेची शोभा वाढवली.टाळ- मृदंगाचा गजर, रिक्षांवर विविधरंगी फुले आणि लाईटच्या माळांची सजावट, रस्त्यावर काढलेल्या रांगोळीच्या पायघड्यांवरून शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत मुख्य मार्गाने महर्षी मार्कंडे यांच्या प्रतिमेचा फोटो लावून अतिशय शांतपणे शोभायात्रा काढली गेली. व महश्री मार्कंडे चौक, मंदिर येथे ह.भ. प. बापूराव महाराज आंदेगावकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.