
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगांव तालुक्यातील दापोरी येथे क्रांतीविर बाबुराव शेडमाके व वीरांगना राणी दुर्गावती मडावी यांच्या तैलचित्राचे अनावरण सोहळा दिं १० जानेवारी २०२२ रोज सोमवरला पार पडला.
यावेळी तैलचित्र सोहळ्या प्रसंगी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे तालुका अध्यक्ष तिरू .विठ्ठल धूर्वे व भाजपा शहर अध्यक्ष डॉ.कुणाल भोयर,यांच्या हस्ते सप्तरंगी गोंडी ध्वजारोहण करून क्रांतिवीर बाबुराव शेडमाके, व वीरांगना राणी दुर्गावती मडावी यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले असून या कार्यक्रमाला उपस्थित पंकज धूर्वे, भोजराज मडावी, राहुल वाढवे, दुर्गाबाई पूरके, सुमनताई घोडाम, अंजनाताई आत्राम, इंदिरा पूरके,अंकुश परचाके, महादेव गेडाम, देवानंद पेंदाम, महादेव परचाके, स्वप्नील मेश्राम, विलास पूरके,विकी तोडासे, पुरूषोत्तम पूरके, ईश्वर मेश्राम, प्रमोद कुमरे, अनूप तोडासे, गणेश शेडमाके, नितीन तोडासे, कुणाल पूरके, शितलताई सलाम, अर्चनाताई गेडाम, नलूताई पूरके, शोभाताई कोवे, ललिताताई उईके, आशाताई शेडमाके, बेबीताई तोडासे, तसेच गावातील सर्व आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.
