पुरड (नेरड) येथील शेतकर्‍यांची विष प्राशन करून आत्महत्या

वणी :- तालुक्यातील पुरड (नेरड) येथील एका शेतकर्‍यांने विष प्राशन करून आपले जिवन संपविले. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संभाजी यादव बदखल वय 50 वर्षे असे असून मृतकाचे नाव असून त्यांचा आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. संभाजी बदखल हे पुरड (नेरड) येथील रहवासी होते. ते शेती करायचे. आज दिनांक 25 मे रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास त्यांनी त्यांचा राहता घरी विषारी द्रव्य प्राशन केले. काही वेळातच त्यांचा कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तातडीने संभाजी यांना कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वणी येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. संभाजी यांच्या कुटुंबीयांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अप्घाप कळू शकले नाही. प्रकरणाचा तपास शिरपूर पोलिस करीत आहे. संभाजी यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे.