उमरखेड तालुक्यातील वन्य भागातून जाणाऱ्या रस्त्याचे काम नादुरुस्त

लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप जाधव


निवडणूक होतात नेते निवडून येतात आश्वासन देऊन मोकळे होतात, निवडण्यापुरतं सर्कलमध्ये फेऱ्या मारतात भाषण ठोकतात मात्र अनेक वर्षापासून बंदी भागात प्रामुख्याने जीवन जगण्यासाठी शेतीवर या भागातील दळणवळण करण्यासाठी मालवाहतूक केली जाते, व आरोग्य केंद्र पर्यंत पोहोचता पोहोचता अनेक जणांचा जीव गमवावा लागला, येथे दळणवळणाची साधने नाही, रोजगार, पाण्याची सोय, आरोग्य, रस्ते अशा अनेक समस्यांना बळी पडावे लागते. मात्र वन विभागातील रस्त्यांचा विकास अद्यापही झालेला नाही, अनेक वर्षापासून या भागात लोकांनी केलेले संघर्ष आंदोलन याचा काही परिणाम नाही,
मात्र नेत्यांनी अद्यापही सर्कलचा विकास केला नाही. उमरखेड सर्कलमधील, मुरली, जेवली, पिंपळगाव, बिटरगाव, मन्याळी, अकोली, चिखली, भवानी, वालतुर, कोर्टा, खरबी दराटी, मोरचंडी, सोनधाबी, गाडी बोरी, जवळा, बंदी टाकळी अशा अनेक गावांना रस्ते नाहीत, घरकुल नाही, विहीर नाही, जिल्हा परिषद सदस्य, या सर्कलवर निवडून येतात, पण गरजा सुटत नाही, नेते काय झोपण्याचे सोंग करत आहेत का? विकास करावा अशी मागणी या सर्व गावाच्या नागरिकाचे आहे.