शेतकऱ्यावर रानडुकराचा हल्ला

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चहादं येथील शेतकऱ्यांवर रानडुकराने अचानक हल्ला चढविल्याची घटना घडली. असून जखमीला वडकी येथे खाजगी दवाखान्यात नेले असता वडकीवरून जखमीला यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे, गोपाळ पंजाब देशमुख असे रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.
गोपाळ देशमुख हे शेतात गेले असता शेतातील काम करत असताना अचानक येवून रानडूकाराने देशमुख यांच्यावर हल्ला चढवीला या हल्ल्यात त्याच्या पायाला तथा पाठीला गभीर स्वरूपाची इजा झाली आहे.त्यांना तत्काळ वडकी खाजगी दवाखान्यात नेले असता त्यांच्या जखमा खोलवर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.या घटनेने शेतकरी शेतमजूरात दहशत पसरली आहे.