
महागाव:-तालुक्यातील शिरपूली येथील सकल मराठा समाजाने आज गुरुवार दि.२६ ऑक्टोबर २०२३ रोजी तहसीलदार महागाव यांना निवेदन देऊन अंतरवाली सराटी जि .जालना येथे कालपासून सुरू झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण संदर्भातील उपोषणाला आपले समर्थन म्हणून आज पासून सकल मराठा शिरपूलीच्या वतीने साखळी उपोषण करण्याचे निवेदन प्र.तहसीलदार विश्वंभर राणे महागाव यांना दिले आहे जोपर्यंत राज्य सरकार सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात ठोस पावलं उचलत नाही तो पर्यंत ते साखळी उपोषण चालू राहणार आहे राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणासंदर्भात २४ ऑक्टोबर रोजी दिलेली मुदत वाढ ही संपली असून राज्य शासनाच्या चाल ढकल धोरणाच्या निषेधार्थ सकल मराठा शिरपूली वाशीयांच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी व येणाऱ्या काळातील निवडणुका बहिष्कार टाकण्याची निवेदनात नमूद करण्यात आले यावेळी धीरज उबाळे, सचिन उबाळे, अंकुश उबाळे, साहेबराव सूर्यवंशी, देवानंद चौधरी, विशाल चौधरी, यांच्यासह खूप मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते
