युवकांनी केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग , पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

वरोरा:- तालुक्यातील अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना यवतमाळ जिल्ह्यात राहणाऱ्या दोन युवकांनी तिचा रस्ता अडवून बोलण्याचा प्रयत्न करत छेडखाणी केली. पीडित मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून कलम 78,79,126( 2 ), 3( 5 ) भारतीय न्याय संहिता, सह कलम 12 अंतर्गत पोस्को चा गुन्हा दाखल करण्यात आला. बादल विनोद भालशंकर वय 24 वर्ष रा. कोसारा ता. मारेगाव . व सचिन चिंतामण कन्नाके वय 30 वर्ष राहणार कोसारा ता. मारेगाव असे आरोपींची नावे आहे. ही घटना काल दि. 29 ऑगस्ट रोजी घडली.
दोन दिवसापूर्वी वरोरा शहरातील नामांकित शाळेमध्ये अल्पवयीन मुलीला वाढदिवसाच्या निमित्ताने बोलवून तिला मिठी मारण्याचा प्रयत्न शिक्षकाने केला या दोन शिक्षकांवर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणाची शाई वाळत नाही तोच अनेक अश्या घटना समोर येऊ लागल्या आहे तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीलायवतमाळ जिल्ह्यातील कोसर येथील दोन युवक सात -आठ दिवसापासून छेडखानी करीत होते. शाळेत जाण्याकरिता आपल्या सायकलने प्रवास करताना रस्ता अडवून इशारे करत होते . सायंकाळी 5 वाजता अल्पवयीन मुलगी आपल्या स्व – गावी जात असताना रस्ता अडवून सायकल थांबउन बोलण्याचा प्रयत्न करीत छेडखानी केली. या नेहमीच्या प्रकाराला कंटाळून पीडित युवतिने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी दि. 31 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. बादल विनोद भालशंकर वय 24 वर्ष रा. कोसारा ता. मारेगाव , सचिन चिंतामण कन्नाके वय 30 वर्ष राहणार कोसारा ता. मारेगाव या युवकांना गावातील काही नागरिकांच्या मदतीने पकडून वरोरा पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत यांच्यावर बालिका अत्याचार प्रतिबंधक कायदा पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पी. एस. आय. मसराम हे करीत आहे.
मनिष भुसारी वरोरा