
1
वणी नितेश ताजणे
यवतमाळ जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 कलम 37 (1) (3) अन्वये जमावबंदी आदेश लागु करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्याअर्थी कोणीही व्यक्ती त्यांचेजवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाही, लाठ्या-काठ्वा किंवा शाररिक ईजा होण्यास ज्या कारणीभूत ठरतील व सहज हाताळता येतील अशी कुठलिही वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ व स्फोटक द्रव्य बाळगणार नाहित, आवेशी भाषणे/अंग विक्षेप/बिटंबनात्मक नकला करणार नाही, सभ्यता व नितीमत्तेला बाधा येईल किंवा ज्यामुळे जिल्ह्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी घोषणा अशी कोणतिही बाब करणार नाही. व्यक्तीच्या किंवा समुदायाच्या भावना जाणुनबुजून दुखावण्याच्या उद्देश्याने वाद्य वाजविणार नाहीत किंवा जाहीरपणे असभ्य वर्तण करनार नाहीत.
ज्याआर्थी दि. 6 सप्टेंबर 2021 रोजी सर्वत्र पोळा व दि. 7 सप्टेंबर 2021 रोजी तान्हा पोळा सन साजरा करण्यात येत असुन गृहविभाग, महाराष्ट्र शासन क्र. डीआयएस / 0621/ प्र.क्र. 143. विशा 1 व दि 2 जुलै 2021 चे परिपत्रका अन्वये कोवीड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मीक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे पोळा सन सार्वजनिक रित्या साजरा न करता आपआपल्या घरीच पुजा करुन, कोणत्याही प्रकारची रँली अथवा मिरवनुक आयोजीत न करता साजरा करावा, नागरीकांनी कोवीड विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण, पोलीस तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. जिल्हादंडाधिकारी सा. यांचे आदेशाचे उल्लंघन झाल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल असे पत्रात नमुद आहेत. त्यामुळे बळीराजांना याहीवर्षी घरीच बैल पोळा व तान्हा पोळा सन साजरा करावा लागणार आहे.
