आ. भावना गवळीं यांनी पंतप्रधान मोदींना बांधली राखी

सहसंपादक : : रामभाऊ भोयर

बहिण भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातही अनेक बहिण-भाऊ आहेत. हे बहिण-भाऊ रक्षाबंधनाला एकत्र येतात. आ. भावना गवळी यांनी देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली. लोकसभा निवडणुकीत यवतमाळ वाशीमच्या माजी खा. भावना गवळी यांनी तिकीट मिळाले नव्हते, त्यांना विधापरिषदेवर उमेवादवारी दिली आणि त्या भरघोस मतांनी निवडून आल्या. भावना गवळी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत होत्या. यावर्षीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधून हा पवित्र सण साजरा केला. भावना गवळी यांनी फेसबुक वर पंतप्रधानांना राखी बांधतानाचा फोटो शेअर केला असून पोस्टमध्ये म्हटले आहे की, “बहिण-भावाच्या नात्यातील ऋणानुबंधाचा गोडवा अधिक वृद्धिंगत व्हावा याकरिता देशाचे सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधली. यावेळी भाऊ म्हणून आपली समर्थ साथ मला समाजकार्यासाठी निरंतर ऊर्जा आणि उत्साह प्रदान करते. त्यामुळे यापुढे देखील आपण नेहमीप्रमाणे बहिणीच्या पाठीशी भक्कमपणे उभे असणारच असा विश्वासासह अपेक्षा व्यक्त केली.”