
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राळेगाव ग्राविकाच्या माध्यमातून शेतकऱ्याने पीकविमा काढला त्यातील बहुतांश शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला पण त्यातील 24 शेतकरी पिकबिम्याच्या लाभापासून वंचित आहे अश्या शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ द्याव या मागणीसाठी राळेगाव ग्राविकाच्या वतीने सहायक निबंधक कैलास खटारे यांना निवेदन देण्यात आले।।।यावर्षी तालुक्यात अतिवृष्टी झाली ,अतिवृष्टीने तसेच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले राळेगाव ग्राविकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पीकविमा काढला त्यातील बहुतांश शेतकऱ्यांना पीकविमा मंजूरही झाला पण त्यातील केवळ 24 शेतकरी पिकविम्याच्या लाभापासून वंचित आहे त्यांच्या पिकाचेही नुकसान झालेच आहे तेव्हा त्या 24 शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ घ्यावा अशी मागणी राळेगाव ग्राविकाच्या वतीने सहायक निबंधक यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे निवेदन देताना ग्राविकाचे अध्यक्ष सचिन हूरकुंडे ,संचालक जानराव गिरी,काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप ठुने ,संचालक कृष्णराव राउळकर,विनायक नगराळे ,तातेश्वर पिसे,गजानन पाल, गजानन महाजन आदी उपस्थित होते.
