
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्याला अतिवृष्टी चा सर्वाधिक फटका बसला. शेतकरी आत्महत्येच्या घटनात देखील वाढ झाली आहे. कपाशीचे एक बोन्ड यंदा घरी आलेले नाही. दिवाळी तोंडावर आहे अशा वेळी अतिवृष्टी अनुदानाची तरी रक्कम शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने करण्यात आली. तहसीलदार तथा कृषी अधिकारी यांना या बाबत आज ( दि. 13) रोजी निवेदन देण्यात आले.
अतिवृष्टी लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्याचे कामं सुरु आहे. मात्र यात तांत्रिक अडचणी, कर्मचारी यांचा असहकार या मुळे हे कामं रेंगाळत असल्याने त्वरित यातून मार्ग काढून शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी राष्ट्वादी काँग्रेस च्या वतीने करण्यात आली.
या वेळी
राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष ,बाळु धुमाळ , तसेच प्रकाश खुडसंगे ,प्रसाद ठाकरे ,पराग मानकर ,दिलीप कन्नाके ,आकाश कुळसंगे ,सुधाकर लोहे ,रोप शेख ,निखिल पावडे ,राजू देवकर ,शैलेश कांबळे ,मयूर मानकर ,किरण भानखेडे ,अबुल देवकर ईत्यादी पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.
