सेवाश्रम परिसरातील साई मंदिराचे भूमिपूजन संपन्न
(राजे मुधोजी भोसले यांची उपस्थिती)

     

राळेगाव यवतमाळ मार्गांवर होऊ घातलेल्या साई सेवाश्रम, स्त्री आधार केंद्र व सेवार्थ रुग्णालयाच्या परिसरातील साई मंदिर चे भूमिपूजन (दि.6 जुलै ) राळेगाव येथे करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वन्शज राजे मुधोजी भोसले यांचे हस्ते हा भूमिपुजन सोहळा पार पडला. या नंतर गार्डन परिसरात महाराजांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. राळेगाव तालुक्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली.या वेळी प्रमुख अतिथी म्हणून राळेगाव नगर पंचायत चे उपाध्यक्ष जानराव गिरी, पुसद अर्बन बँक संचालक मा. श्री प्रविंनजी गांधी संचालक अभिजय सोलर प्रायव्हेट लिमिटेड नागपूर शिशिरभाऊ मुडे, सामाजिक कार्यकर्ते रमेश कनाके,युवा उद्योजक हृषीकेश मेंडोले, ऍड अल्पेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.राजे मुधोजी भोसले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना मला राळेगाव येथे येऊन अंत्यत आनंद झाला, येथे अनेक सेवाभावी वृत्तीची माणसं आहेत, सेवाश्रमाला लागेल तो सीधा पुरवण्याची व्यवस्था आम्ही करू, राळेगाव येथे अपंगाना मदत करण्याचा माणसं आहे, सोबतच गुणवंत विध्यार्थीनीला सर्वतोपरी सहाय्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना जानराव गिरी यांनी शशिकांत उर्फ बाळू धुमाळ हे राळेगाव शहरातील एक सेवाभावी व्यक्तिमत्व असून कोरोना काळात त्यांनी अनेकांना उपचार उपलब्ध करुण दिले. आताही हे मोठे कामं हाती घेतले असून यात यश येईल आमच्या कडून होईल ते सहकार्य करू अशी भावना व्यक्त केली. विनय मुनोत यांनी तसे तर अनाथाश्रम होऊ नये सुसंस्कृत समाजाला ते शोभणारे नाही, मात्र वृद्धाची ससेहोलपाट पाहून दुःख होते, त्या मुळे असा एक आधार उपलब्ध असणे काळाची गरज वाटते. असे भाष्य केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजे मुधोजी भोसले यांचा राळेगाव शहरात आगमनाच्या निमित्ताने न्यू आसरा फाउंडेशन व मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. हृषीकेश मेंडोले यांनी युवा उद्योजक म्हणून मोठे यश गाठले त्यांचा देखील सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात स्नेहा राजू शिरपूरकर या् विध्यार्थीनीने नीट परीक्षेत यश संपादन केले, अंत्यत प्रतिकूल परिस्थितीत तिने यशाला गवसनी घातली तिचा सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हृषीकेश मेंडोले यांनी या मुलीच्या खर्चाचा भार उचलला तर आसरा फाउंडेशन च्या वतीने देखील तिला आर्थिक मदत करण्यात आली. राजे मुधोजी भोसले व राळेगाव येथील मित्र परिवाराच्या वतीने शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती