
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
.
लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीद्वारा थोर समाज सुधारक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुरातन जागृत माता मंदिर वाड नंबर एक वॉर्ड नंबर सहा चा संपूर्ण परिसर साफसफाई करून स्वच्छतेचे महत्व परखून राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना अभिवादन करण्यात आले यावेळी प्रामुख्याने उपस्थित कार्यकर्ते सोनू मुंगले विजय भेंडे संतोष मुंगले संदीप पडधान निलेश मुंगले गवळी विठ्ठल प्रधान मोहन मुंगले अंकुश मुंगले गीता प्रधान समीर गायकवाड इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच भारत मातेला लाभलेले थोर समाज सुधारक यांचे विचार व त्यांचे महान कार्य समाजात व तळागळातील लहान मोठ्यापर्यंत पोहोचावे या उद्दिष्टाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी श्री बापू भाऊ क्षीरसागर श्री वासुदेव रावजी खोब्रागडे सुधाकरजी नगराळे राणीताई धाकड प्रशांत सावरकर भगीरथ वानखेडे रमेश धोंगडे प्रमुख पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व प्रमुख पाहुण्यांचा हस्ते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस मल्हार पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना यावेळी अभिवादन करण्यात आले सर्व उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत यावेळी उपस्थित करून समाजातील नागरिकांना संबोधित केले व आयोजक कमिटीचे व त्यांना याच प्रकारे सातत्याने आपण समाजातील जनतेच्या भावना समजून घेऊन असेच कार्य सदैव करत राहो अशा शुभेच्छा दिल्या यावेळी मदन फलटणकर जीवन गवळी मंगेश वानखेडे रुपेश वानखेडे नितेश मुंगले नितेश मुंगळे उज्वल बावणे गोविंदा मुंगले अंकुश मुंगले आर्यन गवळी सागर मुंगले वेदांत भेंडे कन्हैया मुंगले रंजीत धोंगडे अनिल मुंगले सतीश हजारे लता मुंगले इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
