शेतक-यांना कृषीपंपाचे विज बिल दुरूस्ती करून द्या:शेतकऱ्यांची मागणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

       

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कृषी पंपाचे थकीत बिला पोटी दिनांक 18 नोव्हेंबर 2021 पासून शेती पंपाचा विज पुरवठा कापण्यासाठी ट्रान्सफर (DP) बंद करण्याची कारवाही करणार असा आदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेतक-यांना माहे मे मध्ये देण्यात आलेले कृषीपंपाचे विज बिल हे नियमबाहय व तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे. शेतक-यांना दिलेले कृषी पंपाचे विज बिल हे मीटर रिडींग न घेता सरासरी विज वापराचे बिल दिले आहे. जे विज नियामक मंडळाच्या कायद्या नुसार चुकीचे आहे. . ज्यां शेतक-यांना हार्सपावर प्रमाणे विज बिल दिल आहे. ज्यांचा कडे 3 एच.पी. पंपाचा वापर आहे, त्यांना 5 एच.पी. चे, ज्यांचा 5 एच.पी. चा वापर आहे, त्यांना 7.5 एच.पी.चे बिल दिले आहे. जे पूर्णतः चुकीचे व नियमबाहय आहे. या बिलात पूर्ण वर्षभर ( 12 महीने) विज वापर केला असे गृहीत धरून आकारलेले आहे.
जेव्हा की शेतकरी पावसाळा चे 4 महीने पाऊस राहत असल्याने कृषी पंपाचा वापर करीत नाही. आणी उन्हाळ्यात 3 महीने शेतात पिक नसल्याने व विहिरींना पाणी राहत नसल्याने ओलीतासाठी वापर करीत नाही. तेव्हा वापर न केलेल्या विजेच्या रक्कमेची शेतक-यां कडून मागणी करणे पूर्णतः बेकायदेशीर आहे.
हार्सपावर प्रमाणे विज बिल आकारणी 24 तास वीज पुरवठा केला, असे गृहीत धरून केलेली आहे, जेव्हा कृषी पंपाना विज पुरवठा हा दिवसातून 8 तास होत आहे. म्हणजे 16 तास विज पुरवठा बंद असतानी त्यां रक्कमेची मागणी करणे बेकायदेशीर आहे.
ग्राहकांनी जेवढा विजेचा वापर केला असेल, तेवढेच बिल आकारावे. असा नियम असतानी चुकीची आकारणी करून शेतक-यांना विज बिल देण्यात आले आहे.
कृषी पंपाचे विज वापरावर केंद्र व राज्य शासना कडून अनुदान दिले जाते. ती रक्कम विज कंपनीला किती मिळाली? ती वजा करता शेतक-यांना किती रक्कम देणे आहे. याची नोंद विज बिलात करावी
शेतक-यांकडे 2015 पूर्वीचे थकीत रक्कम कीती? त्या वर व्याज रककमेत सुट कीती रुपयाची देण्यात आली? या नोंदीसह बिल देण्यात यावे.
मुद्दा क्रमांक 1, 2, 3, 4, 5 व 6 प्रमाणे दुरूस्ती करून नव्याने विज बिल द्यावे.
म्हणजे शेतक-यांना ” विज बिल सवलत योजनेत ” सहभागी होवून बिलाची रक्कम योजनेतील निकषाप्रमाणे भरता येईल. या तांत्रीक पण महत्वाच्या दुरूस्ता करून बिल द्यावे.
तो पर्यंत कृषी पंपाचा विज पुरवठा बंद करू नये. खरीपाचे हंगामात विज पुरवठा बंद करून शेतक-यांचे पर्यायाने देशाच्या सकल उत्पन्नाचे नुकसान करू नये.
जर विद्युत कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी, प्रसंगी पोलीस प्रशासनाची मदत घेवून दडपशाही पध्दतीने जोर जबरदस्ती ने विद्युत पुरवठा बंद करण्याचा प्रयत्न करेल, तर शेतक-यांसह शेतकरी संघटना आणी स्वतंत्र भारत पक्षाचे कार्यकर्ते सुध्दा त्याच पध्दतीने प्रतीकार करेल. यातून निर्माण होणा-या वादाला विज कंपनी व स्थानिक प्रशासन जबाबदार राहील.
करिता सदर निवेदनावर योग्य निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. कृषीपंपाच्या विज बिलाची दुरूस्ती करून विज कंपनी ने कृषी पंपाचे विज बिल दिल्या शिवाय ऐन खरीप हंगामात शेतक-यांचे कृषीपंपाचे विज पुरवठा बंद करण्यासाठी पोलीस संरक्षण देवून शेतक-यांचे पर्यायाने देशाचे आर्थिक नुकसान करण्यात येवू नये यासाठी निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी सौ. प्रज्ञाताई बापट प्रदेशअध्यक्षा, महीला आघाडी शेतकरी संघटना
विजय निवल राज्य कार्यकारिणी सदस्य शेतकरी संघटना
राजेंद्र झोटींग जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना
इदरचंद बैद, कृष्णराव भोंगाडे,
दिपकअन्ना आंनदवार,
बबनराव चौधरी,
चंद्रशेखर देशमुख, देवेंद्र राऊत,जयंत बापट, अक्षय महाजन, गोपाल भोयर हे उपस्थित होते.