अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर वर महसूलची कार्यवाही १ लाख ३२ हजाराचा दंड ठोठावला


शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पठारपूर ते शिंधीवाढोना मार्गावर ९ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजता दरम्यान रेतीची अवैधरित्या वाहतूक करीत असलेल्या कायर येथील पंकज भदोरीया यांचा ट्रॅक्टर वणी येथील महसूल पथकांनी पकडुन जप्त केला व मुकुटबन पोलीस स्टेशनला लावण्यात आला. जप्त ट्रॅक्टर क्र MH 29,BP- 1022 व ट्रॉली क्र MH 29, 5510 असून ट्रॉलीमध्ये १०० फूटअवैधरित्या विना रॉयली रेती वाहतूक करीत होता. रेती भरलेल्या ट्रॅक्टरचा पंचनामा करून ठाण्यात लावसण्यात आला असुन ट्रॅक्टर मालकावर १ ,लाख ३२ हजाराचा दंड लावण्यात आला. शिंधीवाढोना पठारपूर व कायर येथील रेतीचोरट्यानी नदि व पठरपूर जवळील नाल्यातून खुलेआम लाखोची रेती चोरी करून बेभव विक्री करीत आहे.
सदर कार्यवाही नायब तहसिलदार रामचंद्र खिरेकर यांच्यासह मंडळ अधिकारी महेंद्र देशपांडे , अरुण मडावी तलाठी गणेश सहाने , मुकेश इंगोले,जावेद शेख यांनी केली.