

जनावर तस्करांच्या मुसक्या आवळणार
सकाळी 06.00 वा.च्या दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे ग्राम वडनेर कडून आदीलाबाद कडे जाणाऱ्या कंटेनर वाहनांमध्ये अवैधरित्या जनावर घेऊन जात आहे अशा माहितीवरून पोलीस स्टाँफ सह दहेगाव फाटा जवळ नाकाबंदी करून सदर कंटेनर वाहन क्रमांक RJ-11 GC- 0203 वाहन थांबवून पाहणी केली असता सदर वाहनांमध्ये काळा रंगाच्या 30 नग हल्ले/ रेडे मिळून आले एकूण किंमत एकुण किं.42,00,000/-रुपये चा मुद्देमाल पंचा समक्ष घटनास्थळावरुन जप्त करण्यात आले. आरोपी ताब्यात आहे. सदर आरोपीत इसम नामे १) दिलशाह इनाम वय ३५ वर्ष धंदा मजुरी रा. किदनईनगर मुजफ्फरनगर ता. जि.मुजफ्फरनगर राज्य उत्तरप्रदेश २) जम्मा सुबेदिन वय ४२ वर्ष धंदा- कंटेनर चालक रा.पचानका ता. हथीम जि.पलवल राज्य हरियाना यांचे विरुध्द पो.स्टे.ला प्राण्यांना निर्दयतेने वागणूक कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करणे सुरू असून सदरची कार्यवाही मा श्री पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक, यवतमाळ, मा श्री पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, मा श्री प्रदीप पाटील, उपविभागीय पोलीस पांढरकवडा यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सपोनि विजय महाले सोबत चालक पो हवा विनोद नागरगोजे, नापोका विलास जाधव, पोकाँ विकेश द्यावर्तीवार यांनी पार पाडली.
