ढाणकी येथील बंद केलेले तहसील कार्यालय पूर्ववत चालू करा रोहित वर्मा यांची मागणी

बिटरगांव ( बु ) प्रतिनिधी शेख रमजान

  

ढाणकी येथील लोकसंख्या ४०हजाराच्या आसपास असून . ४०ते ५०खेडे या गावासी जोडले गेलेले आहेत.ढाणकी नगरीत सन १९९७ मध्ये प्रशासनाने उमरखेड तह‌सील वरचा भार कमी करत, नागरिकांच्या मागणीचा विचार करुन ढाणकी येथे नायब तह‌सील कार्यालय कार्यान्वित केले होते. ढाणकी नगरीतील व गावखेड्यातील नागरिकांचे शासकीय कामे विनाविलंब होत होती. त्यामुळे नागरीक खुश होते. परंतु आचानक पणे ढाणकी येथील नायब तहसील कार्यालय बंद केले गेले. नायब तहसील कार्यालय बंद केल्याने ढाणकी व परिसरातील ४० खेडे गावच्या नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना उमरखेड येथे जावे लागत आहे.उमरखेड तहसील कार्यालयात सर्व तालुक्याचा कामाचा बोजा असल्याने शालेय विद्यार्थ्यांना उमरखेडला अनेक चकरा मारून सुद्धा काम वेळेवर होत नाही. उमरखेडला शालेय कामासाठी गेल्यामुळे शाळेला सुट्टी काढून जावे लागते. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बुडाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर सुद्धा याचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांना सुद्धा शेतातील कामकाज बुडून उमरखेडला तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्याचे व विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होत आहे . पावसाळ्याच्या दिवसात तर, अनेक वेळा लहान मोठ्या नाल्याना पूर येतो.अशा अनेक संकटांना सामोरे जाऊन उमरखेड ला जावे लागते. विद्यार्थी व गाव खेड्यांच्या नागरिकाचा विचार करून त्यांचा त्रास कमी करण्यासाठी शासनाच्या नवीन नियमा प्रमाणे उमरखेड तहसील कार्यालयाचा कामाचा बोजा कमी करून, ढाणकी येथे अप्पर तहसील कार्यलय लवकरात लवकर चालू करण्यात यावे. अन्यथा संविधानिक मार्गाने ढाणकी येथे आंदोलन करण्यात येईल अशा तहेच्या निवेदनामार्फत उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, तसेच तहसीलदार याना भाजपा युवा मोर्चा पुसद जिल्हा महामंत्री रोहित वर्मा यांनी निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी भाजपा युवा मोर्चा पुसद जिल्हा महामंत्री रोहित वर्मा, ढाणकी भाजपा शहर उपाध्यक्ष नागेश रातोळे, पप्पू निमल्लवाड, राजू दोंतुलवार, वैभव कोठारी, विनायक अक्कावार, परमेश्वर इंगळे, गणलेश गांजरे आदी उपस्थित होते.