
उमरखेड तालुका प्रतिनिधी=-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
पत्रकार.
मो. 7875525877
निगनूर :येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्यावतीने हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर एम. एस स्वामीनाथन यांचा 7 ऑगस्ट हा जन्मदिवस शाश्वत शेती दिनानिमित्त नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत उमरखेड तालुक्यातील निगनूर येथे कापूस या पिकाची शेतकरी शेतीशाळा उपविभागीय कृषी अधिकारी श्री अक्षय गोसावी यांच्या मार्गदर्शनात व तालुका कृषी अधिकारी श्री अभय वडकुते यांच्या सहकार्याने घेण्यात आली.
नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये कापूस या पिकाच्या एकूण सहा शेती शाळा पिकाच्या कालावधीमध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करून नियमितपणे घेण्यात येणार आहेत. या शेती शाळेचे पहिले दोन वर्ग पूर्ण झालेले असून तिसरा वर्ग 7 ऑगस्ट रोजी होस्ट फार्मर भारत किसन जाधव यांच्या कापूस या पिकाच्या शेतावर शेती शाळा सहाय्यक कृषी अधिकारी दिशांत घुगरे व उप कृषी अधिकारी सोमनाथ जाधव यांनी घेतली. या शेती शाळेमध्ये सोयाबीन, हळद या पिकावरील येणाऱ्या हुमणी अळीचे नियंत्रण करणे, फवारणी करताना फवारणी करणाऱ्या मजुराने कोणती काळजी घेणे आवश्यक आहे व त्याला जर कोणती दुखापत झाली तर त्यावर काय उपाय योजना करायला पाहिजे याचे सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. शेती शाळेतील शेतकऱ्यांना मित्र कीटकांची ओळख हा खूप महत्त्वाचा हवामान अनुकूल आणि पर्यावरणाशी सुसंगत विषय घेऊन एकात्मिक पद्धतीने कीड नियंत्रण करणे किती आवश्यक आहे व फायद्याचे आहे याबद्दल माहिती शेतकऱ्यांना निशांत घोगरे यांनी दिली.
उप कृषी अधिकारी सोमनाथ जाधव यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा, शेतकरी नोंदणी क्रमांक, पीएम किसान, पिक विमा योजना व रोजगार हमी योजनेमधील फळबाग लागवडीबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली.
या शेती शाळेत निवड केलेले शेतकरी तसेच गावातील अंकुश विक्रम राठोड, विलास राठोड (पत्रकार )प्रल्हाद जाधव कैलास राठोड बळीराम राठोड इतर अनेक शेतकरी उपस्थित होते.
