पवनार गावातील दारू विक्री बंद करा अन्यथा होणार कारवाई
सेवाग्राम पोलीस निरीक्षक यांचा दणदणीत इशारा
ग्रामस्थांनाही पोलीस प्रशासनास मदत करण्याचे आवाहन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

पवनार इथे गेल्या अनेक दिवसापासून दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होती मात्र नवनियुक्त रुजू झालेले पोलीस निरीक्षक विनीत घागे यांनी पदभार संभाळताच दारू विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून गावातील 80% दारू बंद झाल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे या मुळे आज 27/2/2024 रोजी पवनार ग्राम पंचायत इथे दारू विक्रेते ग्रामस्थ ग्राम पंचायत सदस्य महिला भगिनी यांना बोलावून सभा घेण्यात आली.
व दारू विक्रेत्यांना खाकी वर्दीतील रूप दाखवत चांगलीच तंबी दिली या मुळे दारू विक्रेत्यांनी दारू न विकण्याचा जणू निर्णय घेतला.
पवनार परिसरात गेल्या पाच महिन्यात चार तरुण नागरिकांचा विष्यारी गावठी दारूने बळी घेतला या मुळे परिवार उघड्यावर येवून पडला, मुले अनाथ होऊ लागली, महिलांच्या कपाळावरील हसरे कुंकू मिटू लागले, तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली,
अनेक तरुण आजही दारूच्या व्यसनाने आजारी आहे
गावात येत असलेली हात भटीची दारू हि केमिकल युक्त असल्याने शरीराच्या आतील हिष्यावर घातक वार करून शरीर निकामी करत आहे,
दारू मुळे वाद विकोपाला जात आहे,
या मुळे नागरिकांनी हि पोलीस प्रशासनास मदत करण्याचे आवाहन केले आहे.
गावात कुणी दारू विकत असल्यास ग्रामस्थांनी मला गुप्त माहिती द्यावी त्याची माहिती गोपनीय ठेवली जाईल.
पत्रकार, यांनी पेपर मध्ये दारू अथवा अवैध धंदे या बाबत बातमी छापली म्हणून अनेकदा धमक्या देत चाकूने हले केल्याचा आरोप या वेळी करण्यात आला असून पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी या वेळी करण्यात आली असता गावातील नागरिक, ग्राम पंचायत सदस्य पत्रकार, यांच्यावर दारू विक्रेते अथवा अवैध धंदे करणाऱ्यांनी धमकी किंवा हले केल्यास त्यांनी आपली जबाबदारी स्वत घ्यावी त्यावर रीतसर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक यांचे कडून देण्यात आले.
पोलीसच हप्ते घेवून स्वतचं दारू विकी करण्याचे आदेश देत असल्याचं ठपकाही या वेळी ग्रामस्थांन कडून पोलिसांवर ठेवण्यात आला पोलीसच दारू विक्रेत्यांची पाठ राखण करत असेल तर गावातील दारू बंद कशी काय होणार अशी ओरड ग्रामस्थांन कडून करण्यात आली असता मी याबाबत दिलगिरी व्यक्त करतो पण या पुढे असेल काहीही होणार नसून दारू विक्रेते व अवैध धंदे करणाऱ्यांनी यापुढे सतर्क रहावे या पुढे कुणाचीही गय केली जाणार नाही अशी सक्त ताकीद या वेळी सेवाग्राम ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनीत घागे यांच्याकडून देण्यात आली.
त्याच बरोबर पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल पासून दूर ठेवावे सेक्सटॉर्षन सारखे गंभीर प्रकरण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे कुणाला लॉटरी लागली तर विचित्र ॲप्स मधून व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यासारख्या ॲप्स मधून ब्लॅकमेल होत असल्याचे प्रकार दिसून येत आहे या मुळे नागरिकांनी आपल्या मुलाची विशेष काळजी घेण्याची गरज असून मोबाईल सावध गिरीने हाताळन्याची विनंती केली.


गावात दारू मोठ्या प्रमाणात सुरू होती परंतु आपण पदभार स्वीकारला आणि काय ट्रीटमेंट दिती त्या मुळे गावातील दारू विकणे 80% बंद झाली उर्वरित 20% आपण पुन्हा बंद करावी त्या मुळे तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यातून सुटेल


प्रमोद लादे
माजी पं समिती सदस्य


गावातील दारू विकणे जरी बंद झाली तरी नागरिक बाहेर जिल्ह्यातून किंवा गावाच्या परिसरातून पिवून येतात त्या मुळे यावर हि आळा घालणे गरजेचे आहे
वर्धा नागपूर याचे अंतर फार कमी असून मोठ्या प्रमाणात रात्रीच्या सुमारास दारू येत आहे
या कडे पोलीस प्रशासनाने लक्ष ठेवणे गरजेचे आहे
गावातील मोठ्या प्रमाणात गावठी दारू बंद झाली त्या मुळे पोलीस निरीक्षक विनीत घागे साहेब यांचे आभार व्यक्त करतो
.


ग्राम पंचायत सदस्य
रामुजी मगर


या आधीही बरेचदा ग्राम पंचायत मध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने मीटिंग घेत दारू बंदी केली मात्र चार पाच महिने लोटल्या नंतर कारवाईचा धाकच नसल्याने पुन्हा दारू विक्री सुरू होते
या मुळे दारू विक्रेत्यांची हिम्मत बळावत जात आहे
दारू विक्री बंद करून दुसरा पर्याय निवडावा


सरपंच शालिनी आदमणे
पवनार

    

कायद्यापुढे आमचेही हात बांधलेले आहे मात्र यावर कठोर कारवाई करणार दारू विक्रेत्यांनी व अवैद्य धंदे करणाऱ्यांनी कुठल्याही भ्रमात राहू नये


पोलीस निरीक्षक विनीत घागे