शिक्षण विभाग प. स. कळंब अंतर्गत दिव्यांग विद्यार्थी व पालकसह क्षेत्रीय भेट दौरा संपन्न

समावेशित शिक्षण विभाग पंचायत समिती कळंब अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्षेत्रीय भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी त्यांना शैक्षणिक सामाजिक, आर्थिक क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समान संधीचे आकलन होण्यासाठी विशेष गरजा असणाऱ्या बालकांना व पालकांना आचार्य विनोबा भावे कुटीर उद्योग पवनार,गीताई मंदिर, शांती स्तूप, महात्मा गांधी नवी तालीम केंद्र बापू कुटी सेवाग्राम,तसेच डी मार्ट व औद्योगिक क्षेत्र एमआयडीसी देवळी, येथे विद्यार्थी व पालक यांनी संयुक्त भेटी दिली सदर क्षेत्रीय भेटीमध्ये 35 विद्यार्थी व 20 पालकांचा समावेश होता गटशिक्षणअधिकारी श्री.अमोल वरसे यांनी हिरवी झेंडी दाखवून क्षेत्रीय भेटीसाठी रवाना केले उपस्थित गट समन्वयक श्री. नारायण हेडाऊ केंद्रप्रमुख सौ.कल्पना हजारे श्री. तुमराम सर (मुख्खाध्यापक) साधनव्यक्ती सौ. डॉ वनिता ठाकरे कु. कांचन वानखडे सौ. होमवती पाटील कु. तेजस्विनी रहाटे सौ. आरगुलवार कु. शगुफ्ता खान यांनी उपस्थित राहून क्षेत्रीय भेटीला शुभेच्छा दिल्या
दिव्यांग विद्यार्थी व पालक यांची क्षेत्रीय भेट यशस्वी होण्यासाठी श्री. सचिन पोटुरकर (समा.तज्ञ) श्री समीर कवडे (अभियंता) श्री. संजय निकोडे श्री. रतन गोंडे श्री नितीन नष्करी श्री. श्री शंकर आत्राम श्री भगत सर यांनी अथक परिश्रम घेतले तसेच विद्यार्थी व पालक यांनी क्षेत्रीय भेटीबाबत समाधान व्यक्त केले व दिव्यांग विद्यार्थ्याकरिता असेच भेटीचे आयोजन करावे असं शुभेच्छा दिल्या.