
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील अण्णाभाऊ साठे चौकातील नंदीबैलपोळा हा सातत्याने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आला आहे. या वर्षी देखील ही परंपरा कायम राहिली लाखोंची बक्षीसे, शासन प्रशासनातील वरिष्ठाची उपस्थिती, महिलां-पुरुष व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि चिमुकल्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग या मुळे हा तान्हा पोळा आनंदाची पर्वणी ठरला. उपविभागीय अधिकारी पाटील, तहसीलदार अमित भोईटे, गट विकास अधिकारी केशव पवार, ठाणेदार मालटे मॅडम यांचे सह मान्यवरांनी उपस्थित राहून चिमुकल्याच्या कलाकौशल्याला भरभरून दाद दिली.
बाळू धुमाळ मित्र परिवार व प्रभाग क्र. 5 च्या वतीने तान्हा पोळा आयोजनाचे हे तिसरे वर्ष होते.याची जय्यत तयारी आयोजकांच्या वतीने करण्यात आली . राळेगाव शहरातील चिमुकल्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.अंत्यत कल्पक सजावटीसह नंदी बैल यात सहभागी झाले. 6 सायकल, 6 स्टडी टेबल, 6 फॅन, 6 स्मार्ट वॉच, या सह प्रत्येक गटात एकूण 12 बक्षीसे होती. या 6 गटात उत्कृष्ट नंदी, उत्कृष्ट सजावट, नावीन्यपूर्ण संदेश, उत्कृष्ट बासिंग, उत्कृष्ट वेशभूषा, व उत्कृष्ट मांडणी असे वर्गिकरण करण्यात आले. 6 गटामध्ये एकूण 72 मोठी बक्षीसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. प्रत्येक सहभागीला बक्षीस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. पावसाने व्यत्यय आला असला तरी त्या बाबतचे नियोजन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या वेळी निवड समिती चे महत्वाचे कामकाज प्रतिक बोबडे, ससनकर सर, निंबूळकर सर, विनय मुनोत,संजय पोपट, यादव सर, राजू रोहणकर,सोनेकर सर, अरविंद तामगाडगे, संजय बोथरा, सिडाम सर, प्रकाश खुडसंगे यांनी यशस्वी व पारदर्शकपणे पार पाडले.
या वेळी जेष्ठ पत्रकार महेश शेंडे, प्रकाश मेहता,राष्ट्रपाल भोंगाडे ,डॉ. कुणाल भोयर, मेंडोले काकाजी, सुरेश वर्मा, गोवर्धन वाघमारे, यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते.यात प्रत्येक सहभागी प्रत्येक स्पर्धकला हमखास बक्षीस मिळणार आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचलन व आभार मनिष काळे यांनी मानले.
