
सहसंपादक : रामभाऊ भोयर
तालुक्यातील झुल्लर कोच्ची गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कोच्ची येथील जलजीवन मिशन अंतर्गत विहिरीच्या कामाबाबत व गावातील पाण्याच्या समस्येबाबत आज दि २ जानेवारी रोजी ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच गावातील नागरिकांनी गटविकास अधिकारी राळेगाव तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना निवेदन दिले आहे.
कोच्ची गावात जलजीवन मिशन अंतर्गत २ वर्षापासून विहिरीचे काम चालू आहे. परंतु विहिरीला पाणी नाही.मागील नोव्हेंबर महिन्यात आडवे बोर मारले तरीही विहिरीला पाणी पुरेशे प्रमाणात उपलब्ध झालेले नाही.भविष्यामध्ये गावाला पाण्याची टंचाई भासू शकते गावाला पाण्याचा दुसरा स्त्रोत उपलब्ध नाही. मे महिन्यापासून दरवर्षी शेतकऱ्यांच्या शेतातून पिण्याच्या पाण्यासाठी बोर अधिग्रहित करावा लागते.सदर या संपूर्ण बाबींचा विचार करून प्रत्यक्ष स्पॉट चौकशी करून निर्णय घेण्यात यावा आणि गावाला पिण्याच्या पाण्याकरिता दुसऱ्या विहिरीची तरतूद करून द्यावी अश्या मागणीचे निवेदन नागरिकांनी वरिष्ठांना दिले आहे यावेळी निवेदन देतांना उपसरपंच किशोर कोकाटे,
शिवसेना उपतालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य दिवाकर जवादे, नंदकिशोर गोफणे,रामेश्वर कोकाटे विलासराव शेडमाके,श्रीराम मडावी
,पंकज वेले,प्रवीण भेदुरकर,मयूर भेदरकर उपस्थित होते.
