

तिरोड़ा – रोजगारक्षमता आणि आर्थिक वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास महत्वाचा आहे म्हणुन जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा येथे समग्र शिक्षा अभियानांतर्गत वर्ष 2015 – 2016 पासून व्यवसाय शिक्षण आटोमोबाइल व मल्टीस्किल हे विषय शिकविले जात आहेत.

महाराष्ट्रात ६४६ शासकीय शाळांमध्ये समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण (Vocational Education) दिले जाते. यामध्ये व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा, स्वतःचा व्यवसाय सुरु करता यावा तसेच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या विविध संधी सहज उपलब्ध व्हाव्यात म्हणुन जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा येथील आटोमोबाइल विषयाचे शिक्षक उमेंद्र रहांगडाले यांच्या प्रयत्नशील कार्याला यश मिळाले. याचीच फलश्रुती म्हणुन आटोमोबाइल विषय पास होऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विविध कंपन्यानमध्ये नौकरी ची संधी प्राप्त झाली आहे. यात
- रितेश हरिकीसन विठोले (20100 रू. ) SUZUKI MOTORS GUJRAT,
- दीपक मगणलाल रहांगडाले (20100 रू. ) SUZUKI MOTORS GUJRAT,
- प्रगती महिपाल लीलहारे (14500 रू. ) FIAT AUTOMOBILE PRIVATE LTD. RANJANGAON PUNE,
- सविता किशोर कांबळी (14500 रू. ) FIAT AUTOMOBILE PRIVATE LTD. RANJANGAON PUNE,
- करिश्मा राजकुमार उताणे (14500 रू. ) FIAT AUTOMOBILE PRIVATE LTD. RANJANGAON PUNE,
- यश कमल साठवणे (10000 रू. ) METALFAB MIDC NAGPUR,
- विनेश छन्नू आदमने (9500 रू. ) SPACEWOOD FURNITURE PVT LTD. NAGPUR,
- अतुल हरीराम बागडे (6000 रू. ) BHARAT AUTOMOBILE Churadi,
- अजय बाणासूरे (11000 रू.) पर्सनल वर्क ऑटोमोबाइल गॅरेज व इलेक्ट्रिशियन,
- प्रणय राजन राऊत (8000 रू.) JANATA GARAGE TIRORA,
- आशिष परिहार (6000 रू.) DINESH AUTO CENTRE GONDMOHADI, TIRORA.
- आर्यन धनीद्र निनावे (8000 रू.) SAI AUTOMOBILE TIRORA येथे मासिक वेतन प्रात करीत आहेत.
तसेच वर्ग 9 वी ते 12 वी पर्यंत व्यवसाय शिक्षण उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जसे पॉलिटेक्निक साठी 15% किंवा ITI साठी 25% आरक्षित जागा उपलब्ध असतात म्हणुन आटोमोबाइल विषय उत्तीर्ण झालेल्या 30 विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे.
व्यवसाय अभ्यासक्रम ऑटोमोबाइल विषयामध्ये उच्च शिक्षण घेणार्या आणि विविध कंपन्यानमध्ये निवड झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेतील मुख्याध्यापक श्री. मा. जी. एच. रहांगडाले सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग तसेच ऑटोमोबाइल शिक्षक उमेंद्र रहांगडाले यांनी केले.
