
राळेगाव तालुका प्रतिनिधी:रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रोजगार सेवक संघटनेमार्फत राळेगाव विधानसभेचे आमदार मा.प्रा.डॉ.अशोकराव उईके साहेब यांना भेटून निवेदन देण्यात आले, यावेळी निवेदनात ग्रामरोजगार सेवकांचा आकृतिबंध संयोजन करून शासकीय सेवेत समाविष्ट करावे,किमान वेतन कायद्याअंतर्गत ठराविक मासिक वेतन देण्यात यावे,ग्रामरोजगार सेवकांना ०२/०५/२०११ च्या शासन निर्णयात सुधारणा करून पूर्णवेळ करण्यात यावे,मानधन वयक्तिक खात्यात जमा करावे, रोजगार सेवकांना विमा संरक्षण प्रदान करावे,यासह अनेक मागण्या करण्यात आल्या आणि या सर्व रोजगार सेवकांच्या मागण्या आपल्या मार्फत हिवाळी अधिवेशनाच्या पटलावर मांडण्यात याव्या अस साकडं आमदार प्रा.डॉ.अशोकराव उईके साहेबांना घालण्यात आलं यावेळी रोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास बावणे(वाटखेड),मयुर जुमळे(चिखली),वासुदेव सिडाम(चहांद),संजय कांबळे(जागजई),निलेश भगत(आष्टा) यांच्यासह अनेक रोजगार सेवक उपस्थित होते
