राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचे राज
काँग्रेस समर्पित १८ पैकी १४ उमेदवार विजयी

सहसंपादक -रामभाऊ भोयर

राळेगाव येथील नुकत्याच पार पडलेल्या बाजार समितीची निवडणूक काल दिं ३० एप्रिल २०२३ रोज रविवारला न्यू इंग्लिश हायस्कूल व जिल्हा परिषद वाढोणा बाजार व वडकी जिल्हा परिषद येथे शांततेत पार पडली असून निवडणुकीनंतर लगेच निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला निवडणूक निकाल उशिरा लागला असून यात राळेगाव बाजार समितीवर काँग्रेस समर्पित पॅनलने १८ पैकी १४ जागावर उमेदवार निवडून आणल्याने पुन्हा बाजार समितीवर प्रफुल राज कायम राहणार आहे. काल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व कायम ठेवत एकूण १८ जागेसाठी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी १४ जागांवर आपला दणदणीत विजय मिळवत भाजप समर्थित पक्षाला केवळ ४ जागेवर समाधान मानावे लागले असून यात ग्राम विविध सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण मतदार गटातून (१) प्रफुल मानकर (२)अरविंद वाढोनकर (३)दीपक देशमुख(४) संजय देशमुख (५) राजू ठाकरे (६) आशिष कोल्हे (७) गजानन पारखी तर सहकारी संस्था महिला गटातून (१) प्राजक्ता प्रवीण कोकाटे (२) माया विनोद जयपूरकर ,तर इतर मागासवर्गीय सहकारी संस्था गटातून (१)राजेंद्र महाजन विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून (१) गोविंद चहादंकर, तसेच ग्राम पंचायत गटातून अनुसूचित जाती जमातीतून (१) अंकुश मुनेश्वर, तर व्यापारी अडते गटातुन (१)अंकित कटारिया तर मापारी हमाल गटातून (१) गोवर्धन वाघमारे असे एकूण १४ उमेदवार काँग्रेस समर्पित निवडून आले आहे.
तर भाजपा समर्पित ग्राम पंचायत गटातून (१)रोशन कोल्हे (२)सुधीर जवादे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे (३)गटाचे विनोद काकडे तसेच व्यापारी अडते गटातून (१)गणेश देशमुख यांना
चार जागेवर समाधान मानावे लागले असून ही झालेली निवडणूक मोठी चुरशीची ठरली असून मोठ्या फरकाने मताधिक्याने निवडून येऊन पुन्हा बाजार समितीवर सहकार क्षेत्रात महर्षी समजणाऱ्या अँड प्रफुल मानकर यांनी आपली एकहाती सत्ता काबीज करून बाजार समितीवर प्रफुल राज सत्ता दाखवून दिली आहे.