ढाणकी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी


प्रतिनिधी: प्रवीण जोशी


ढाणकी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरयांची 298 वी जयंतीमोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी ९ वाजता राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक येथे अहिल्या देवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आला. व११ते ३ महाप्रसादाचा कार्यक्रम आटोपून लगेच ३ते१०मिरवणूक मार्गे भव्यदिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती, ना कसला गोंधळ, ना तंटा सर्व समाज एकत्र येत , फुलांच्या आरासित सजलेली अहिल्यादेवीं ची प्रतिमा, अहिल्याबाईं ची वेशभूषा केलेली चिमुकली मुले अन् जातीपातीचे बंधन तोडून एकत्र आलेली तरुण पिढी… हे चित्र होते काल ढाणकी येथे साजऱ्या झालेल्या अहिल्याबाई होळकर जयंतीचे.
ढाणकी – उमरखेड रोड वरील राजमाता अहिल्याबाई होळकर चौकातील प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून 298 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित बांधवांपैकी काहींनी अहिल्यादेवींच्या आयुष्यातील घडामोडींवर प्रकाश टाकला. त्यांच्या जीवनातील त्याग, साहस, न्याय, कुशल प्रशासन, धर्म पारायणता इत्यादी गुणांचा प्रत्येकाने आपल्या जीवनात समावेश करून त्यांचा आदर्श घ्यावा असेही प्रतिपादन केले. हिंदू धर्मातील मंदिरांचा जीर्णोद्धार, तीर्थक्षेत्रावर बांधलेले घाट, पाणपोया, धर्मशाळा, नद्यांवरील पुल इ. अहिल्यादेवींनी केलेल्या लोकोपयोगी कामातून प्रेरणा घेऊन आपण ही त्यांचा विचार वारसा पुढे चालवण्याचा निर्धार उपस्थितांनी केला. याच वेळी त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून येत्या पावसाळ्यात प्रत्येकाने पाच झाडे दत्तक घेऊन त्यांचा वर्षभर सांभाळ करण्याचा संकल्प केला. ढाणकी येथील सर्व हिंदू समाजातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.शहरातील सर्व धनगर बांधव ,प्रतिष्ठित नागरिक, युवा वर्ग ,लहान चिमुकले व महिलांचा मोठा सहभाग शोभायात्रेत दिसून आला. टाळ मृदंगाच्या गजराने व ढोल ताशा पथक याने ढाणकी नगरी दुमदुमून गेली होती. शहरातील भजनी मंडळांनी या रॅलीमध्ये विशेष सहभाग घेऊन शोभा यात्रेत अधिकच सुबकता वाढवली.टाळ- मृदंगाचा गजर, रथावर विविधरंगी फुले आणि लाईटच्या माळांची सजावट, रस्त्यावर काढलेल्या रांगोळीच्या पायघड्यांवरून शेकडो शहरवासीयांच्या उपस्थितीत संपूर्ण शहरातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचा फोटो लावून अतिशय शांतपणे शोभायात्रा काढली गेली. यावेळी बाळासाहेब पाटील चंद्रे,आनंदराव चंद्रे , भास्कर पाटील चंद्रे, दीपक पाटील चंद्रे, उकंडा लकडे,दिगांबर शिरडकर,तुकाराम वैध, दिगांबर वैद्य, आनंदा कांगटे,महेश चंद्रे,आबधुत,पाटील चंद्रे,खंडेराव लकडे,दत्ता हाके,गजानन वैद्य,अक्षय बिट्टेवाड,मारोती बीट्टेवाड,संजय बीट्टेवाड,बंडू चंद्रे, आवधूत शिरडकर,साहेबराव वाघमोडे,ई .धनगर समाज बांधव उपस्थित होते.


राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंती निमित्त ढाणकी शहरातील सर्व मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार करून हिंदू धर्माला वैभवाचे दिवस दाखवणाऱ्या अहिल्या देवींना अभिवादन म्हणून हा उपक्रम हाती घेतल्याचे सर्व समाज बांधव यांच्या वतीने सांगण्यात आले. येत्या काळात अहिल्या देवींची जयंती घराघरात साजरी करण्याचा मानस ही यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याचे परिसरात बोलले जात आहे.