शेषरत्न बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब ऑफ वरोरा तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन ,जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे आवाहन


सरकारी रक्तपेढी चंद्रपूर यांच्या मार्फत 8 डिसेंबर 2024 रोजी रविवारी ला स्थळ महावीर भवन फुंदाबाई सवारीच्या च्या बाजुला डोंगरवार चौक..वेळ सकाळी 9 ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

सध्या चंद्रपूर वर्धा नागपूर शहरातील सरकारी तसेच खाजगी रक्तपेढी मधे रक्त पिशव्याची अत्यंत गरज आहे. परंतु सद्ध्या ची चंद्रपूर जिल्ह्यातील परिस्थिती बघता दोन दोन दिवस रक्ताच्या पिशवी पासुन वंचित राहण्याची वैळ आली आहे..तसेच 20ते25 टक्के रक्तच उपलब्ध होते. उद्या 8 डिसेंबर रविवार ला होणाऱ्या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने रक्तदाता स्वताच कर्तव्य समजून नक्की पुढाकार घेऊन थॅलेसेमिया, सिकलसेल, कर्करोग, डेंग्यू, डिलिव्हरी रुग्णांकरिता रक्ताची मोठी आवश्यकता असते. या शिबिरात जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन धिरज लाकडे अध्यक्ष शेषरत्न बहुउद्देशीय संस्था व बंडु भाऊ देऊळकर अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ वरोरा याप्रसंगी करण्यात आले.