ग्रामपंचायत ची रणधुमाळी,उमेदवारांची धाकधूक वाढली

प्रतिनिधी:चंदन भगत, आर्णी


आर्णी तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला होता.कोरोनामुळे त्या निवडणूका लांबणीवर पडल्या.
मार्च-एप्रिल मध्ये होणाऱ्या निवडणुका covid-19 मुळे अडखळल्या.गावपुढारी खूप मेहनत घेऊन निवडणूक लढविण्याच्या तयारीत, गुडघ्याला बाशिंग बांधून होते.कोरोना मुळे अनेकांचे स्वप्न विभंगल्या गेले.
महाराष्ट्र निवडणूक आयोगाने नुकताच ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जारी केला त्यामुळे अनेक गावपुढारी व इच्छुकांनी पुन्हा तयारी दर्शविली आहे.
आपापल्या वॉर्डातील मतदार यादांच्या झेरॉक्स काढणे,आपणच गावाचा विकास करू असे समजावून सांगणे ह्या गोष्टी सुरू झाल्या आहेत.
कार्यकाळ संपला असलेल्या ग्रामपंचायत मध्ये धावपळ पहावयास मिळत आहे.
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी