
सहसंपादक : रामभाऊ भोयर
एका केशरी रंगाच्या ट्रकमध्ये कत्तलीसाठी गोवशांची हैद्राबाद कडे अवैधरीत्या वाहतुक करून घेउन जात असतांना वडकी पोलिसांनी कारवाई करीत २२ गोवंशाची सुटका केली. ही कारवाई सोमवारी (दि.१७) वर्धा नदीच्या तिरावर करण्यात आली.
मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हददीतील राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वर ठिकठिकाणी टीम नेमुण सदर केशरी रंगाच्या ट्रकचा शोध घेत असताना ट्रक एम एच ४० बि.एल. ३७६२ या ट्ररकला नागपुरकडे पळुन जात असताना वर्धा नदीच्या पुलावर दोन्ही कडील वाहतुक ठप्प करून सदर वाहन पकडून वाहनाची पंचा समक्ष तपासणी केली. सदर वाहना मध्ये २२ गोवंश प्रत्येकी २५,०००/- रू प्रमाणे एकुण ५,५०,०००/- आणी वाहण किमंत २०,००,०००/- असा एकुण २५,५०,०००/- रू चा मुददेमाल मिळुन आला. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांवर कलम ३२५ भारतीय न्याय सहीता २०२३ सह कलम ५, ५ अ. ५ व महाराष्ट्र प्राणी सरक्षण कायदा, सहकलम ११ प्राण्यास कुरतेने वागविण्यास प्रतीबंध अधिनियम आणि कलम १८४/१७७ मोटार वाहन कायदा प्रमाने गुन्हा नोद करण्यात आला असुन यातील गोवश गोशाळेत जमा करण्यात आले आहे. सदरची कारवाही जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता सा., अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात सा., तसेच सहा. पोलीस अधिक्षक रॉबिन बन्सल यांचे मार्गदर्शना खाली वडकी पोलीस स्टेशन येथील सपोनी भोरकडे, वाढई, करपते. कोष्टवार, नेवारे, मोतेराव यांनी केली.
