राज्य शिक्षक संघ यवतमाळ च्या जिल्हा सचिव पदी नितीन जुनूनकर नियुक्ती

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राज्य शिक्षक संघ अमरावती र. न. 423/19 या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दिलीप कडू असून या शैक्षणिक .संघटनेचे काम प्रत्यक्षात 2015 पासूनच सुरू आहे आणि अश्या या संघटनेचे जाळे अमरावती विभागातील पाचही जिल्हा मधे पसरलेले आहे .यवतमाळ जिल्ह्यामधे सुद्धा या संघटनेचे काम माजी मुख्याध्यापक .सुरेंद्र कडू सर यांच्या मार्गदर्शन खाली सुरू आहे. सुरेंद्र कडू सर यांनी न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव येथील सहायक शिक्षक श्री.नितीन जुनुनकर यांची राज्य शिक्षक संघ यवतमाळ च्या जिल्हा सचिव पदी नियुक्ती केली .त्यामुळे न्यू इंग्लिश शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद यांनी . नितीन जुनुनकर सर यांचे अभिनंदन केले आहे.