
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या पुण्यतिथीनिमित्त स्व. सौ. चंदाताई बबनराव राडे यांच्या स्मृतीप्रत्यर्थ भव्य मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. १६ मार्च २०२५ रोजी, सकाळी ११ वाजता हे शिबिर तुकडोजी महाराज मंदिर, झाडगाव येथे संपन्न होणार आहे.
या शिबिरात कस्तुरबा हॉस्पिटल, सेवाग्राम येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची नेत्रतपासणी केली जाणार आहे. तपासणीअंती मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना ऑपरेशनसाठी सेवाग्राम येथे नेण्यात येणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन चित्तरंजन कोल्हे (माजी जिल्हा परिषद सदस्य) यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून अशोकराव केवटे (माजी सभापती, पंचायत समिती राळेगाव) उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमाला सरपंच बाबाराव किन्नाके, डॉ. ज्ञानेश्वर मुडे गुरुदेव प्रचारक, प्रशांत वाणी पोलीस पाटील, उल्हास देशपांडे सामाजिक कार्यकर्ते, वासुदेव तिजारे तंटामुक्त समिती अध्यक्ष, रोशन कोल्हे उपसरपंच, अकुंश रोहणकर वसंत जिनिंग उपाध्यक्ष, अनिल केवटे, खरेदी-विक्री संघ उपाध्यक्ष, भरत पाल माजी अध्यक्ष तंटामुक्त समिती, अविनाश भोयर, रूपेश रेंघे ग्रामगीताचार्य, हरी कुबडे गुरुदेव प्रचारक, उमेश केवटे ग्राहक मंच अध्यक्ष, शरद केवटे सामाजिक कार्यकर्ते, बंडू संगेवार शिवसेना उबाठा यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत तपासणी व उपचाराची संधी उपलब्ध होणार आहे. सर्व नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक सचिन राडे व शंकरराव तोडासे यांनी केले आहे.
